Header AD

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली भेट



 

■महायुतीचे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील प्रश्नांवर पंतप्रधानांची भेट घ्यावी - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले...


 मुंबई दि. 10 - रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी आज माजी मुख्यमंत्री आणि आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. 



            यावेळी झालेल्या चर्चेत मराठा आरक्षण ; पदोन्नतीमधील मागासवर्गीयांचे आरक्षण आणि तोक्ते चक्रीवादळग्रस्तांना मदत या राज्यातील प्रमुख प्रश्नांवर महायुती चे प्रमुख नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्यावी अशी सूचना ना रामदास आठवले यांनी यावेळी केली.



            त्यावर आपण लवकरच पंतप्रधानांची वेळ घेऊन महायुती च्या वतीने महाराष्ट्रातील ज्वलंत प्रश्नांसाठी पंतप्रधानांची भेट घेऊ असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी ना.रामदास आठवले यांच्या सूचनेचा स्वीकार केला. यावेळी रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर; माजी आमदार सुमंतराव गायकवाड उपस्थित होते. 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली भेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली भेट Reviewed by News1 Marathi on June 10, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडीत लाखो रुपयांवर डल्ला मारणाऱ्या ग्रामसेविकेस निलंबित करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ठोकले ग्रामपंचायत कार्यालयास ठोकले टाळे...

भिवंडी दि 25 (प्रतिनिधी ) ग्रामपंचायतीं करीता राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजना अंतर्गत विकास कामांसाठी लाखो रुपये दिले जात अ...

Post AD

home ads