Header AD

आंतर राष्ट्रीय योग दिनाचे निमित्याने `योग संवाद' ई पुस्तकाचे प्रकाशन

डोंबिवली (  शंकर जाधव )  योग ही भारतीय संस्कृतीने संपूर्ण जगाला दिलेली देणगी आहे. प्राचीन वैदिक परंपरा लाभलेल्या योगास आतंरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्याचे कार्य अनेक योग गुरूंनी केले. तसेच योगाचे खंदे समर्थक भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे माध्यमातून योग १३५ देशात पोहोचवला ' असे प्रतिपादन डॉ सुनील खर्डीकर यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे निमित्याने केले.          अक्षर  आनंद न्यूज पोर्टल आणि जायंटस् ग्रुप ऑफ कल्याण यांचे विद्यमाने डॉ योगेश जोशी आणि *हेमंत नेहते संपादित ' योगसंवाद '  या ई पुस्तकाचे ऑनलाईन प्रकाशन* समारंभ प्रसंगी ते बोलत होते.डॉ. सुनील खर्डीकर आपल्या अध्यक्षीय भाषणात पुढे म्हणाले की, ज्या प्रमाणे जागतिक पातळीवर योगाचा प्रसार होत आहे त्याप्रमाणे ज्या मातीत योग जन्माला आला व रुजला त्या भारत भूमीमध्ये योगाचा मोठ्या प्रमाणावर प्रचार व प्रसार होणे आवश्यक आहे. आपल्या बदललेल्या जीवन शैलीमध्ये योगाचे अनन्य साधारण महत्व आहे, असेही त्यांनी सांगितले.           कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ मधुसूदन घाणेकर यांनी वैदिक योगपरंपरा आणि त्या काळातील जीवनशैली या माहिती देऊन सांगितले की , योगाचे महत्त्व केवळ योग दिनापुरते मर्यादित न राहता तो आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झाला पाहिजे. योगाच्या प्रचार आणि प्रसारार्थ जायंटस् ग्रुप ऑफ कल्याण , अक्षरआनंद न्यूज पोर्टल या सारख्या संस्था जे कार्य करीत आ  हेत ते निश्चितच स्पृहणीय आहेत.           जायंटस् वेल्फेअर फाउंडेशन वन सी चे प्रेसिडेंट अशोक मेहता यांनी उपक्रमासाठी शुभेच्छा देऊन योगसंवाद हे ई पुस्तक  जायंटस्चे  माध्यमातून किमान पाच हजार वाचकांपर्यंत पोहोचेल असा आशावाद व्यक्त केला. अक्षरमंच प्रकाशनाचे वतीने प्रकाशित आणि डॉ योगेश जोशी व हेमंत आ. नेहते  यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाचे संयोजन जायंटस् ग्रुप ऑफ कल्याणचे प्रेसिडेंट प्रमोद जोशी यांनी केले होते.       योगसंवाद हे ई पुस्तक सर्वांना विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे प्रकशिका सुनंदा जोशी यांनी सांगितले आहे. उपक्रम यशस्वी होण्यासाठी नगरसेविका ज्योती मराठे, माजी नगरसेवक राजन मराठे , भालचंद्र घाटे , ॲड. मंदार कुलकर्णी , ॲड यतीन गुजराथी,  रोहन जोशी , संकेत खर्डीकर यांनी विशेषत्वाने सहकार्य केले.
आंतर राष्ट्रीय योग दिनाचे निमित्याने `योग संवाद' ई पुस्तकाचे प्रकाशन आंतर राष्ट्रीय योग दिनाचे निमित्याने `योग संवाद' ई पुस्तकाचे प्रकाशन Reviewed by News1 Marathi on June 21, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads