Header AD

आर्यग्लोबल समूहाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

 



कल्याण , कुणाल  म्हात्रे  : दरवर्षी प्रमाणे यंदा ही आर्य ग्लोबल समूहाच्या वतीने योग दिवस साजरा करण्यात आला. यावर्षी या समूहाने आपल्या सर्व सदस्यांसाठी १२ दिवसांच्या आभासी योग प्रशिक्षण शिबिराची व्यवस्था केली होती. या शिबिरात विविध योग आसनांचा सराव आणि त्या करण्याचा योग्य मार्ग आणि त्यानंतर ध्यान केले गेले.



९ जून पासून दररोज सकाळी हया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आणि २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन” साजरा करण्यासाठी भव्य कार्यक्रम झाला. आग्लोबल समुहाचे अध्यक्ष भरत मलिक यांनी योगा फॉर लाइफ” या कार्यक्रमाची थीम दिली. आर्यग्लोबल समूह सर्व लोकांच्या निरोगीपणा आणि कल्याणावर विश्वास ठेवतो आणि हे सध्या करण्याचा योग हा एक मार्ग आहे. आम्ही योगासन जीवनशैली मानतो आणि प्रत्येकाने योगासनांचे महत्व आणि त्याचा परिपूर्ण आयुष्य जगण्यावर त्याचा होणारा परिणाम समजून घ्यावा अशी आमची इच्छा असल्याचे भरत मलिक यांनी सांगितले.



सध्याच्या धकाधकीच्या काळात प्रत्येकजण योगासनाचे महत्व जाणून घेत आहे. कोविडशी लढण्यासाठी शारीरिकदृष्या तंदुरुस्त राहण्यासाठी त्याचे महत्व चांगले आहे. योग एक 'एकात्मिकव्यायाम आहे जो शारीरीकमानसिक आणि आध्यात्मिक कल्याणकारी आहे आणि 'एकात्मिक विकासहे आर्य ग्लोवल शाळांमधील मुख्य तत्वज्ञान असल्याचे नांदिवली आणि अंबरनाथ आर्यगुरूकुल, तसेच सेंट मेरी स्कूल कल्याण या शाळांच्या प्राचार्यांनी सांगितले.



सर्व शाळांच्या पालकांनी प्रशिक्षण शिविराचेविशेषतः विविध आसनांचे तपशीलवार प्रदर्शन व त्यांचे स्पष्टीकरण यांचे कौतुक केले. त्यांनी प्राणायाम व ध्यान सत्रांचा पुरेपूर आनंद लुटला. काही पालक आपले अनुभव आणि कौतुक सामायिक करण्यासाठी शाळेत पोहचले.

आर्यग्लोबल समूहाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा आर्यग्लोबल समूहाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा Reviewed by News1 Marathi on June 21, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

१.२५लाख वितरकांना कमाईची संधी देणार 'इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१' ११-१३ ऑगस्ट दरम्यान होणार आयोजन

मुंबई, २ ऑगस्ट २०२१:  भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. य...

Post AD

home ads