Header AD

रेल्वे मोटरमनच्या सर्तकतेमुळे वृद्धाचे वाचले प्राण...
डोंबिवली ( शंकर जाधव ) रेल्वे रूळ ओलांडताना किंवा रेल्वेतून पडून आजवर अनेकांना आपला जीव गमवावा लागला.मात्र रेल्वे रुळावर चालत असलेल्या एका वृद्ध इसमाचे रेल्वे  मोटरमनच्या सर्तकतेमुळे वृद्धाचे प्राण वाचले. हि घटना ४ तारखेला दुपारी १ वाजण्याच्या सुमारास विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाजवळ घडली.पोलिसांनी वृद्ध इसमाच्या मुलाला पोलीस ठाण्यात बोलावून त्याच्या ताब्यात दिले.  मिळालेल्या माहितीनुसार, असताना विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाजवळ बदलापूर लोकल येत होती. त्यावेळी दिनद्याल भानुशाली ( वय ७९ ,रा. कल्याण पूर्व ) हे रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे रुळावर चालत होते. रेल्वे स्थानकाजवळ येत असलेल्या बदलापूर लोकलच्या मोटरमनने  काही  अंतरावर वृद्ध इसमास रेल्वे रुळावर चालत असल्याचे पहिले.प्रसगांवधान राखत मोटरमनने रेल्वे लोकल थांबवली.रेल्वे स्थानकात कल्याण रेल्वे पोलीस ठाणे नेमुकीकीतील पोलीस शिपाई व्हरकट व गोंधळे यांना संपर्क साधून माहिती दिली.      पोलिसानी घटनास्थळी धाव घेऊन मोटरमनच्या माहितीनुसार वृद्धास समजावून पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी भानुशाली यांची समजूत काढत त्यांच्या मुलाची माहिती घेतली. त्यांचा मुलगा त्रिकुटजी भानुशाली यास पोलीस ठाण्यात बोलावले. काही वेळाने चर्चा करून पोलिसांनी मुलाच्या ताब्यात वडिलांना दिले.आपल्या वडिलांचे प्राण वाचविणाऱ्या मोटरमनचे आणि पोलिसांचे त्रिकुटजी भानुशाली यांनी आभार मानले.

रेल्वे मोटरमनच्या सर्तकतेमुळे वृद्धाचे वाचले प्राण...  रेल्वे मोटरमनच्या सर्तकतेमुळे वृद्धाचे वाचले प्राण... Reviewed by News1 Marathi on June 05, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads