Header AD

लसीकरणासाठी ग्रामीण भागातील जनतेला आणखी दिलासा आडीवली उप केंद्रावर लसीकरण केंद्र सुरू नगरसेवक कुणाल पाटील यांच्या प्रयत्नांना यश

 कल्याण  , कुणाल  म्हात्रे  : कल्याण पूर्वेतील आडीवली आरोग्य उपकेंद्रावर लसीकरण केंद्र सुरु झाले असून स्थानिक नगरसेवक कुणाल पाटील यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. हे लसीकरण केंद्र सुरु झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना आणखी दिलासा मिळणार आहे.कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे असून ग्रामीण भागातील नागरिकांना भेडसावणारी समस्या लक्षात घेऊन आडीवली आरोग्य उपकेंद्रावर लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी नगरसेवक कुणाल पाटील यांनी शासनाकडे पाठवपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून आजपासून याठिकाणी नागरिकांसाठी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन नगरसेवक कुणाल पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. या केंद्रामुळे ग्रामीण भागातील जनतेला लसीकरणासाठी लांब जावे लागणार नाही. तसेच नागरिकांचा वेळ आणि त्रास देखील वाचणार आहे.  नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले असून आडीवली गावात लसीकरण केंद्र सुरू केल्या बद्दल नागरिकांनी नगरसेवक कुणाल पाटील यांचे आभार मानले आहेत. यावेळी उद्योगपती विजय भानेमाजी नगरसेवक गणेश भानेमाजी सरपंच बळीराम भानेसमाजसेवक अनिल पाटील,   माजी उपसरपंच वासुदेव गायकरकेशव भानेपंढरीनाथ पाटील आदि मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.       नागरिकांच्या लसीकरणासाठी मेहनत घेण्याऱ्या सर्व डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे पाटील यांनी आभार मानले आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी याच भागातील द्वारली आरोग्य उपकेंद्र याठिकाणी देखील लसीकरण केंद्र सुरु झाले असून आता आडीवली येथे देखील लसीकरण सुरु झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. 

लसीकरणासाठी ग्रामीण भागातील जनतेला आणखी दिलासा आडीवली उप केंद्रावर लसीकरण केंद्र सुरू नगरसेवक कुणाल पाटील यांच्या प्रयत्नांना यश लसीकरणासाठी ग्रामीण भागातील जनतेला आणखी दिलासा आडीवली उप केंद्रावर लसीकरण केंद्र सुरू नगरसेवक कुणाल पाटील यांच्या प्रयत्नांना यश Reviewed by News1 Marathi on June 09, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads