Header AD

ब्रह्मांड कट्ट्यावर बरसला काव्य रुपी पाऊस!

               ठाणे  , प्रतिनिधी  :  सृष्टिला नव चैतन्य देणारा व प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा पाऊस. अशा या पावसाला शब्दात गुंफतो कवी. आज ब्रह्मांड कट्ट्यावर *कवीच्या वहीतला पाऊस* हा कवितांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात विजयराज बोधनकर, कॅप्टन वैभव दळवी, रवींद्र भगवते, संतोष पाठारे या मान्यवर कवींनी भाग घेतला.           सर्वप्रथम विजयराज बोधनकर यांनी माती आणि पाऊस या कवितेतून माती व पावसाचे घट्ट नाते पहील्या कवितेतून  उलगडून  दाखविले. पावसाचे मातीला भरभरून देणे व त्यातून फुलणा-या सृष्टिला पाण्याची कशी आवश्यकता आहे म्हणून धोंड्या धोंड्या पाणी दे कवितेतून पावसाची आळवणी केली तर पाऊस पक्ष बदलतो या कवितेतून पावसाची विविध रूपे दाखवली व रसिकांना  आता लोक कसे पक्ष बदलतात याची आठवण झाली व रसिकाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 
       पाऊस येतो या कवितेतून तेव्हा लोकांना नेमके काय वाटते याबद्दल सहजपणे सांगितले. कॅप्टन वैभव दळवी यांनी धाव पावसा रे या कवितेतून  रूसलेल्या पावसाची आळवणी केली.कॅप्टन दळवी हे जहाजावर कार्यरत असल्याने समुद्रामधील मौसमी व रूद्र पाऊस अनुभवला आहे.अटलांटिक महासागरात अनुभवलेल्या पावसाचे वर्णन चक्रिवादळ या कवितेतून त्यांनी केले. पाऊस आणि मन ,पाऊस कधी येताना या त्यांच्या कवितेतून पावसाची उत्कटता दाखविली.वीज म्हणाली पावसाला या कवितेतून शहरात  मुसळधार पावसामुळे होणा-या हालाचे  वास्तववादी चित्रण सादर केले .                          कवी संतोष पाठारे यांनी ज्याचा त्याचा पाऊस , बावरा पाऊस  या कवितेत प्रियकर व प्रेयसीच्या पावसांच्या आठवणी जागवल्या. पाऊस आणि वादळ,  ओला चिंब पाऊस या कवितेने रसिकांची मने चिंब केली. रवींद्र भगवते यांनी जादुगर,  आकाश डोंगर , ओल्या चिंब रात्री  या आशय घन कविता सादर करीत कार्यक्रमात बहार आणली.  त्यांनी छत्र्या  या रोमँटीक कवितेतून छत्रीचे अफलातून वर्णन केले आहे. कार्यक्रमाच्या शेवटी कॅप्टन वैभव दळवी यांनी रखुमाई ही सुंदर कविता सादर केली.          या कवितेतून पावसामुळे नटलेली बहरलेली  सृष्टि  त्यांना विठ्ठल रखुमाई भासली.  नुकताच सुरू झालेला पाऊस, आणि कविला दिसलेला पाऊस भावला त्यांनी तो शब्दबद्ध केला असा हा पाऊस कविंच्या वहीतुन  बरसला. रसिकांची मने चिंब भिजवून गेला . संस्थापक राजेश जाधव यांनी या मान्यवर कवींचे स्वागत केले तर अध्यक्ष  महेश जोशी  यांनी सुरेख निवेदन केले.

ब्रह्मांड कट्ट्यावर बरसला काव्य रुपी पाऊस! ब्रह्मांड कट्ट्यावर बरसला काव्य रुपी पाऊस!     Reviewed by News1 Marathi on June 21, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads