Header AD

नाल्याचे काम न झाल्यास नाल्यात बसून आंदोलन करणार

 

संतप्त भाजप पदाधिकारी सुशीलकुमार पायाळ यांचा आयुक्तांना इशारा...



कल्याण , कुणाल  म्हात्रे : नालेसफाई न झाल्याने शिवसेना नगरसेवकाने ठेकेदाराला नाल्यात बसवल्याची घटना ताजी असतांनाच कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील अ प्रभाग हद्दीतील वार्ड क्र- १३  मोहने गावठाण  परिसरात  बहुचर्चित नाल्याचे रखडलेले काम  अनेक वर्षांपासून होत नसल्याने भाजपचे सचिव सुशिलकुमार पायाळ यांनी वारंवार तक्रारी करून सुद्धा नाले गटाराचे काम मार्गी लागत नसल्याने २१ जून रोजी नाल्यात बसून आंदोलन करण्याचा इशारा केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी  यांना पत्रव्दारे दिला आहे .


     प्रभाग क्र १३ मोहने गांवठाण  मध्ये आदेश कंडोमपा/लेखा/ अभियांत्रिकी/२६६ अंतर्गत नाल्याचे काम सुरू करण्यात आले होते. अर्धे काम झाल्यानंतर सलीम काझी नामक इसमाने विरोध करून जागा आपल्या मालकीची असल्याचे सांगत काम बंद पाडलें. त्यानंतर जमीन मालक दत्ता काशीनाथ तरे यांनी सत्यप्रतिज्ञा पत्र देऊन सलीम काझी नसून माझ्या मालकीची असल्याचे सांगितले.   त्यानंतर नाल्याचे विकास कांम  सुरू होणे अपेक्षित होते मात्र पालिका पालिका अधिकारी टोलवाटोलवी उत्तर देत असून मुख्य नाल्याचे काम पूर्णत्वास नेत नाहीत.



याबाबत मोहने टिटवाळा शहर सचिव सुशीलकुमार पायाळ दोन वर्षांपासून पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेअनेक स्मरणपत्रे देऊन ही नाल्याचे काम मार्गी लावत नसल्याने परिसरातील नागरिकांची होणारी गैरसोय याचा विचार करीत शेवटी २१ जून रोजी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना सोबत घेऊन नाल्यात आंदोलन करण्याचा इशारा पत्राव्दारे पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांना दिला आहे. 



दरम्यान लाखो रुपये खर्च करून ही नाल्याचे काम करण्यात ठेकेदार कुचराईपणा करीत असेल तर संबंधितांनावर गुन्हे दाखल करवून  नाल्याचे काम मार्गी लावावे आणि नागरिकांची होणारी गैरसोय कमी करण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी पायाळ यांनी केली आहे.

नाल्याचे काम न झाल्यास नाल्यात बसून आंदोलन करणार नाल्याचे काम न झाल्यास नाल्यात बसून आंदोलन करणार Reviewed by News1 Marathi on June 14, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खड्ड्यात पडून शिवसेना शाखा प्रमुख जखमी...

  डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी  हो...

Post AD

home ads