Header AD

भिवंडी, एमआयएम शहारा ध्यक्षावर अत्याचाराचा गुन्हा; समर्थकांचा, डीसीपीला घेराव घालत गोंधळ; ५० समर्थ कांवर गुन्हा दाखल ..

 
भिवंडी दि 21 (प्रतिनिधी )  एका ३८ वर्षीय माहिलेने भिवंडी शहर एमआयएम पार्टीचे शहराध्यक्ष  खालिद गुड्डू याच्यावर शुक्रवारी रात्री उशिरा भिवंडी शहर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच शनिवारी खालिद गुड्डू यास पोलोसांनी पुन्हा एकदा अटक केल्याने संतप्त झालेल्या ४५ ते ५० समर्थकांनी भिवंडी डीसीपी कार्यलयासमोर गोंधळ करीत पोलीस उपायुक्तांना घेराव घालता. आज याप्रकरणी गोंधळ घालून घेराव करणाऱ्या समर्थकांवर शांतीनगर पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करीत त्यांचा शोध सुरु केला आहे. ■एमआयएम च्या शहराध्यक्षावर ८ खंडणीसह २ बलात्काराचे गुन्हे ..


 

            इमारत बांधकाम व्यासायिका कडून एक लाख रुपयांची खंडणी घेताना भिवंडी शहर  एमआयएम पार्टीचे शहराध्यक्ष खालिद गुड्डू यांना खंडणी विरोधी पथकासह ठाणे गुन्हे शाखेने २४ सप्टेंबरच्या मध्यरात्री गुड्डू यांच्या समदनगर येथील बंगल्यावर व्यावसायिकाकडून एक लाख रुपयांची खंडणी स्वीकारताना रंगेहात पकडले होते. त्यानंतर त्यांच्यावर खंडणीसह इतर गुन्ह्यांमधील सुमारे आठ हुन अधिक गुन्हे दाखल झाले होते. याच दरम्यानच्या काळात  एक बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने तब्बल नऊ महिन्यांच्या कारावासानंतर चाळीस दिवसांच्या पे रॉल वर खालिद गुड्डू यांची सुटका झाली होती.           त्यानंतर  स्थानिक पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. अशातच एका ३८वर्षीय माहिलेने गुड्डू याच्यावर शुक्रवारी रात्री उशिरा शहर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणेज बलात्कारा दुसरा गुन्हा दाखल होताच शनिवारी खालिद गुड्डू यास पोलोसांनी पुन्हा एकदा अटक केली आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

            

■ समर्थकांनी 'या' मागणीसाठी घातला डीसीपीला घेराव .. 

 

         राजकीय हेतूने व आकसा पोटी होत असल्याचा आरोप करीत आरोपी खालिद गुड्डू यांच्या परिवारासह एमआयएमचे शेकडो कार्यकर्त्यांनी भिवंडी पोलीस उपायुक्त कार्यालयाबाहेर एकत्र जमत खालिद गुड्डू यांच्यावरील खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांची सखोल चौकशी करा व खालिद गुड्डू यांची सुटका करा अशा घोषणा दिल्या. त्याचदरम्यान भिवंडी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण कार्यालयासमोर आले असता जमावाने त्यांना घेराव घालत खालिद गुड्डू याच्या सुटकेची मागणी केली.              काही काळ पोलीस उपायुक्त कार्यालयासमोर पोलीस व एमआयएम कार्यकर्त्यांमध्ये बाचा बाची झाली. त्यानंतर पोलीस उपायुक्त कार्यालाबाहेर अतिरिक्त वाढीव कुमक आल्याने पोलिसांनी जमावाला पांगवले. काही काळ परिसराला छावणीचे रूप आले होते. त्यानंतर एमआयएमच्या शिष्ठमंडळाने खालिद गुड्डू संदर्भातील मागण्यांचे निवेदन पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांच्याकडे सोपविले होते. मात्र आज ५० समर्थकांवर सरकारी कामात आडथडासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल झाल्याने भिवंडीतील एमआयएम पक्षात एकच खळबळ उडाली आहे. 

भिवंडी, एमआयएम शहारा ध्यक्षावर अत्याचाराचा गुन्हा; समर्थकांचा, डीसीपीला घेराव घालत गोंधळ; ५० समर्थ कांवर गुन्हा दाखल .. भिवंडी,  एमआयएम शहारा ध्यक्षावर अत्याचाराचा  गुन्हा; समर्थकांचा, डीसीपीला घेराव घालत गोंधळ; ५० समर्थ कांवर गुन्हा दाखल .. Reviewed by News1 Marathi on June 21, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads