Header AD

जागतिक पर्यावरण दिना निमित्त आरएसपी अधिकारी युनिट तर्फे वृक्षारोपण




कल्याण , कुणाल  म्हात्रे  : जागतिक पर्यावरण दिना निमित्ताने कल्याण येथे आरएसपी अधिकारी युनिट कमांडर मणिलाल शिंपी यांच्या उपस्थितीत स्वामी नारायण हॉल ट्रस्टचे दिनेश ठक्कररुपेश भोईर यांच्या हस्ते रहेजा कॉम्प्लेक्सलोक उद्यानगुरुद्वारा कंपाऊंड या ठिकाणी लिंबचिंच,पिंपळवड या वृक्षारोपण करण्यात आले.


वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाल्याने नैसर्गिक ऑक्सिजनची कमी भासत आहे. कोरोनाच्या महामारीत ऑक्सीजन लेवल कमी झाल्यामुळे अनेक लोकांना जीव गमवावा लागला म्हणून एक मूल एक झाड ही संकल्पना घेऊन प्रत्येकाने आपल्या परिसरातील मैदानात सोसायटीच्या आवारात रस्त्याच्या कडेला अशा पद्धतीने वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी संकल्प करावा व येणाऱ्या काळात ऑक्सिजन अभावी दुर्घटना होऊ नयेत यासाठी या उपक्रमात सर्व बंधू-भगिनी सहभाग घ्यावा असे आवाहन आरएसपी कमांडर मणिलाल शिंपी यांनी केले. स्वामीनारायण ट्रस्टचे दिनेश थक्कर यांनी पर्यावरण दिन साजरा करण्यासाठी १०० झाडांच्या रोपांची व्यवस्था केली. 

जागतिक पर्यावरण दिना निमित्त आरएसपी अधिकारी युनिट तर्फे वृक्षारोपण जागतिक पर्यावरण दिना निमित्त आरएसपी अधिकारी युनिट तर्फे वृक्षारोपण Reviewed by News1 Marathi on June 07, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads