Header AD

कल्याण ग्रामीण भागात चक्की नाका ते नेवाळी नाका दरम्यान मानवी साखळी


■नगरसेवक कुणाल पाटील मानवी साखळी आंदोलनात सहभागी...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : नवी मुंबईत होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर केल्यानंतर या नामांतरावरून वाद उफाळून आला आहे. विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचेच नाव दिले जावे अशी मागणी स्थानिक भूमीपुत्रांकडून केली जातेय. 


 

            या मागणीसाठी भूमिपुत्रांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे.  कल्याण ग्रामीण भागात चक्की नाका ते नेवाळी नाका पर्यंत मानवी साखळी करण्यात आली. या आंदोलनाला नगरसेवक कुणाल पाटील यांनी पाठींबा देत चक्की नाका ते नेवाळी नाका पर्यंतच्या मानवी साखळीत सहभागी होत नवि मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव दयावे अशी मागणी त्यांनी केली. या आंदोलनात तिसगाव, नांदिवली,द्वारली, भाल, वसार आदी गावातील ग्रामस्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.   

कल्याण ग्रामीण भागात चक्की नाका ते नेवाळी नाका दरम्यान मानवी साखळी कल्याण ग्रामीण भागात चक्की नाका ते नेवाळी नाका दरम्यान मानवी साखळी Reviewed by News1 Marathi on June 10, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads