Header AD

संत रविदास सार्वजनिक जयंती उत्सव समिती चर्मकार विकास संघ महाराष्ट्र राज्यात विलिन

 



कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  संत रविदास सार्वजनिक जयंती उत्सव समिती उल्हासनगर कल्याण समिती चर्मकार विकास संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेत विलीन करण्यात आली.  तसेच चर्मकार विकास संघाचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांच्या हस्ते संत रविदास सार्वजनिक जयंती उत्सव समिती उल्हासनगर कल्याणच्या सर्व पदाधिकाऱ्यांना कोविड योद्धा प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं.



संत रविदास सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गजानन लिंबोरे व सर्व पदधिकारी कार्यकारणी सदस्य यांच्या सह मोठ्या संखेने समाज बांधवांनी चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांच्या उपस्थितीत संस्थेचे ठराव पत्र दिले.



 खामकर यांनी संस्थेचे अध्यक्ष व पदधिकारी सदस्य यांचे चर्मकार विकास संघात स्वागत करुन संस्थेने समाज हितात निर्णय घेतल्याने सर्वांचे अभिनंदन केले. चर्मकार समाजाच्या विकास न्यायहक्क आणि संन्माना करीत भविष्यकाळात एकजुटीने कार्य करण्यात येईल असे अश्वासन दिले.



दरम्यान यावेळी संत रविदास जयंती उत्सव समितीच्या वतीने संजय खामकर यांचा सत्कार करण्यात आला. खामकर यांनीही संत रविदास सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

संत रविदास सार्वजनिक जयंती उत्सव समिती चर्मकार विकास संघ महाराष्ट्र राज्यात विलिन संत रविदास सार्वजनिक जयंती उत्सव समिती चर्मकार विकास संघ महाराष्ट्र राज्यात विलिन Reviewed by News1 Marathi on June 28, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

१.२५लाख वितरकांना कमाईची संधी देणार 'इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१' ११-१३ ऑगस्ट दरम्यान होणार आयोजन

मुंबई, २ ऑगस्ट २०२१:  भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. य...

Post AD

home ads