Header AD

कल्याणातील अति धोका दायक इमारती चे पाडकाम

 



कल्याण , कुणाल  म्हात्रे  :-  कल्याण पश्चिमेतील रामबाग परिसरातील सगुण या अतिधोकादायक इमारतीचे पाडकाम गुरुवारी "ब" प्रभागक्षेत्र आधिकारी, त्यांच्या पथकाने  केले.    

                  
   
              महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अतिधोकादायक इमारती निष्कासित करणेबाबतचे निर्देश सर्व प्रभागक्षेञ अधिका-यांना दिले आहेत. त्या अनुषंगाने ब प्रभागातील चिकणघर, रामबाग लेन ४ येथील "सगुण"  या तळ + २ मजल्याच्या अतिधोकादायक इमारतीला मा. न्यायालयाने दिलेला स्थगन आदेश रद्द झाल्यामुळे ब प्रभागक्षेत्र अधिकारी चंद्रकांत जगताप यांनी सोमवारपासून सदर इमारतीच्या निष्‍कासनाच्या कारवाईस सुरूवात केली.



    
           सदर कारवाई ठेकेदाराचे १० कर्मचारी ,१ पोकलेन मशीन, ब प्रभागातील अतिक्रमण विभागातील १० कर्मचारी,महात्मा फुले पोलिस स्टेशनचे १ अधिकारी,५ पोलिस कर्मचारी आणि महापालिका अतिक्रमण निर्मुलन विभागाचे १० पोलिस कर्मचारी यांच्या सहकार्याने करण्यात आली असून ही निष्कासनाची कारवाई आज पूर्ण झाली.
कल्याणातील अति धोका दायक इमारती चे पाडकाम कल्याणातील अति धोका दायक इमारती चे पाडकाम Reviewed by News1 Marathi on June 24, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

१.२५लाख वितरकांना कमाईची संधी देणार 'इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१' ११-१३ ऑगस्ट दरम्यान होणार आयोजन

मुंबई, २ ऑगस्ट २०२१:  भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. य...

Post AD

home ads