Header AD

रावसेना सामाजिक संस्थेतर्फे सिटीपार्क मध्ये वृक्षरोपण

 




कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण येथील गौरी पाड्यातील केडीएमसी सिटी पार्क परिसरात रविवारी  राव सेना सामाजिक संस्थेमार्फत वृक्षरोपणाचा अभियान राबविण्यात आले.



कोरोना काळात ऑक्सीजनचे महत्त्व संपूर्ण जगाला समजले असून ऑक्सीजन न भेटल्यामुळे अनेक जणांनी आपले प्राण गमावले. त्यामुळे ऑक्सीजन कीती महत्वपूर्ण आहे समजले. या गोष्टी लक्षात घेता रावसेना सामाजिक संस्थेमार्फत केडीएमसी सिटी पार्क परिसरात ३०  रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमांत रावसेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अमोलराव सोळंके यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. वृक्षरोपण कार्यक्रम प्रमुख साहिल आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम राबवण्यात आला.



यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष आकाश आखाडेसंपर्क प्रमुख आशुतोष आहेरक्रीडा सेना अध्यक्ष निलेश शेलारकार्याध्यक्ष चंदन वझेजिल्हा अध्यक्ष तेजस कोंडाररवी शर्मा,  ज्ञानेश ननावरेशहर अध्यक्ष दीपक बांडेजयेश मराठेतनय गायकवाडवेध मोरेशुभम चौधरीदैविक वझेगितेश शेलार,  यश आदी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

रावसेना सामाजिक संस्थेतर्फे सिटीपार्क मध्ये वृक्षरोपण रावसेना सामाजिक संस्थेतर्फे सिटीपार्क मध्ये वृक्षरोपण Reviewed by News1 Marathi on June 21, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads