Header AD

तर केंद्र सरकार विरोधात रस्त्यावर उतरून ओबीसींचा निर्णय घ्यायला भाग पाडू


■कॉंग्रेस ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांचा ईशारा....


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : ओबीसी आरक्षणाचा निर्णय पुन्हा न घेतल्यास केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध महाराष्ट्रातील ओबीसी समाज रस्त्यावर येऊन केंद्राला निर्णय घ्यायला भाग पाडू असा इशारा कॉंग्रेसच्या ओबीसी विभागाचे प्रदेश अध्यक्ष भानुदास माळी यांनी दिला आहे.      महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे नवनियुक्त अध्यक्ष भानुदास माळी यांचासंपूर्ण महाराष्ट्रात दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून कल्याण शहरातील ओबीसी कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी व कल्याण शहर (जि.) प्रदेश स्तरावरील नवीन पदाधिकारी निवडी संदर्भात चर्चा करण्यासाठी भानुदास माळी गुरुवारी कल्याण मधील मुथा कॉलेज येथे आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कल्याण शहर ओबीसी अध्यक्ष जयदीप सानप यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सानप यांनी माळी यांचा शाल पुष्पगुच्छ श्रीफळ देऊन स्वागत करत आपला कार्यअहवाल सादर केला.यावेळी माळी यांनी बोलतांना सांगितले कि, ओबीसी समाज हा कॉंग्रेसमधून इतरत्र विखुरला आहे, मुस्लिमांची संख्या देखील देशात मोठी आहे. ते देखील विवीध राजकीय पक्षात दाखल झाल्याने कॉंग्रेच्या हक्काची मते बाजूला गेली आहेत. त्याचप्रमाणे दलित समाज देखील कॉंग्रेसपासून दूर गेला आहे. या सर्वाना पुन्हा पक्षात आणण्याचं काम प्रदेशअध्यक्ष नाना पटोले यांनी सोपवले असून या कामात यशस्वी होणार असून महाराष्ट्रात दलित, बीसी, ओबीसी, एससी, एनटी समजातील लोकांची आवक कॉंग्रेसमध्ये करण्यासाठी महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यातून कॉंग्रेस पक्ष महाराष्ट्रात पुन्हा एकदा प्रबळ होईल.         आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात नेहमीच गाजला आहे. नरेंद्र मोदींनी आरक्षणाचे मुद्दे सर्व विकून टाकले आहेत. ज्या ज्या ठिकाणी आरक्षण होतं त्या त्या कंपन्या विकून खाजगीकरण केलं आहे. त्यामुळे आरक्षण पूर्णपणे संपत आलं आहे. जे काही थोडं आरक्षण आहे त्याच्यावर देखील घाला घालून या देशातील दलित, ओबीसी, भटके विमुक्त, मुस्लीम यांना देशोधडीला लावायचा ऐतिहासिक कार्यक्रम बीजेपीने आरएसएसच्या माध्यमातून करायला सुरवात केली आहे. ओबीसी आरक्षणाचा निर्णय पुन्हा न घेतल्यास केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध महाराष्ट्रातील ओबीसी समाज रस्त्यावर येऊन केंद्राला निर्णय घ्यायला भाग पाडू असा इशारा कॉंग्रेसच्या ओबीसी विभागाचे प्रदेश अध्यक्ष भानुदास माळी यांनी दिला आहे.तसेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कॉंग्रेस कदाचित स्वंतत्रपणे लढून आपला प्रभावी पक्ष स्थान निर्माण करेल यासाठी तीन वर्षाचा कालवधी देखील आहे. कल्याण डोंबिवलीत देखील कार्यकर्त्याचं म्हणणे ऐकून नाना पटोलेयांच्यासोबत बैठक आयोजित करून पक्षाला उभारी द्यायचं काम केलं जाईल.   काँग्रेस नेते प्रकाश मुथा, अलका वळस्कर, माजी नगरसेवक इफ्तेकर खान यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन माजी शिक्षण समिती सदस्य चंदर पांडे यांनी केले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष धनराज राठोड, शेरेकर, दिनकर राऊत, राजा जाधव, शिबू शेख, उपअध्यक्ष सलीम शेख, अल्पसंख्यांक अध्यक्ष राजेश शर्मा, विनोद शिंपी, रियाज सय्यद, सुमित जाधव, रॉकी सिंह, संतोष नेटारे, अशपाक शेख आदींसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

तर केंद्र सरकार विरोधात रस्त्यावर उतरून ओबीसींचा निर्णय घ्यायला भाग पाडू तर केंद्र सरकार विरोधात रस्त्यावर उतरून ओबीसींचा निर्णय घ्यायला भाग पाडू Reviewed by News1 Marathi on June 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महिलांसाठी स्वतंत्र पोलीस कक्ष आणि महिला पोलिसांचीही गस्त हवी महिला कॉंग्रेस प्रदेश अध्यक्षा संध्या सव्वा लाखे

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   महिलांसाठी स्वतंत्र पोलीस कक्ष आणि साध्या वेशातील पोलिसांसह महिला पोलिसांचीही प्रत्येक ठिकाणी गस्त हवी असल्याच...

Post AD

home ads