Header AD

नेहमी करा योग ; तुमच्या जवळ येणार नाही रोग - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले



मुंबई दि. 21  -  नेहमी करा योग ; तुमच्या जवळ येणार नाही रोग; नेहमी करा योग; निघून जाईल तुमचा रोग असे आपल्या खास  काव्यमय शैलीत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी देशवासियांना शुभेच्छा देत नियमित  योग करण्याचे आवाहन केले.



            मनाच्या एकाग्रतेसाठी योगाची नितांत आवश्यकता आहे. योग केल्यामुळे आयुष्य वाढते त्यामुळे नियमित योग करावा. मी सुद्धा रोज कपालभाती हा योग प्रकार करीत असतो. योग ही जगाला भारत देशाने दिलेली महान देणगी आहे. अडीज हजार वर्षा पूर्वी भगवान बुद्धांनी भारतात सर्वप्रथम  विपश्यना( मेडिटेशन )ची महान विद्या  जगाला दिली याचा आम्हाला अभिमान आहे असे ना.रामदास आठवले म्हणाले. 

नेहमी करा योग ; तुमच्या जवळ येणार नाही रोग - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले नेहमी करा योग ; तुमच्या जवळ येणार नाही रोग  - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले Reviewed by News1 Marathi on June 21, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads