Header AD

पागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय.. डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार

 

 डोंबिवली  ( शंकर जाधव )  पागडी पद्धतीने राहणाऱ्या भाडेकरूंना इमारत धोकादायक झाल्याचे सांगत पालिकेने बळजबरीने घरे खाली करण्यास भाग पाडले असून हे रहिवासी रस्त्यावर आले आहेत. त्यामुळे डोंबिवली शहरात पागडी पद्धतीने राहणाऱ्या रहिवाशांना त्रास सहन करावा लागत असल्याचे   पुन्हा एकदा समोर आले आहे. विशेष म्हणजे घर मालक आणि पालिका प्रभाग अधिकारी यांचे धागेदोरे असून दोघांनी मिळून आम्हाला घराबाहेर काढल्याचा आरोप या इमारतीमधील रहिवासी करत आहेत. 
    डोंबिवली पश्चिम येथील गुप्ते रोड वरील शांताराम व्हिला या इमारतीला २५ वर्ष पूर्ण होत आहेत. या इमारतीत एकूण  १३ भाडेकरू  पागडी पद्धतीने राहत होते. मात्र अचानक मंगळवारी इमारतीला पालिकेने ही इमारत धोकादायक असल्याची नोटीस  लावली असून ताबडतोब घर खाली करण्याच्या सूचना दिल्या. घर खालीकेले नाही तर पोलिस बाळाचा वापर करावा लागेल असेही सांगण्यात आले. विशेष म्हणजे या संदर्भात घरमालकाने भाडेकरुसोबत कोणतीही चर्चा केली नसल्याने हे भाडेकरू संभ्रमात पडले आहेत.बुधवारी दुपारी महापालिका आयुक्त विजय सुर्यवंशी यांनी डोंबिवली विभागीय कार्यालयात भेट दिली.
 

        यावेळी या सर्व भाडेकरूनी सध्या कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे नवीन घर घेणं तसेच दुसरीकडे भाडे भरून राहणे शक्य नसल्याचे सांगत प्रभाग अधिकारी आणि घरमालक मिळून हा सर्व खटाटोप करत असल्याचे सांगितले. तसेच छप्पर नसल्याने आमचे पुनर्वसन करा अशी मागणी देखील ते करत आहेत. विशेष म्हणजे शांताराम व्हीला ही इमारत केवळ २५ वर्ष जुनी असून डोंबिवली शहरात ५०  वर्ष झालेल्या इमारती देखील तशाच आहेत मग आमची इमारत का पडतात असा आरोप त्यांनी यावेळी केला.

          यावेळी डोंबिवली भाजप ग्रामीण महिला अध्यक्षा मनीषा राणे यांनी देखील पालिका नेहमीच गरिबांवर अन्याय करते असे सांगत आत्तापर्यंत अनेक पागडी वर राहणाऱ्या भाडेकरूंना हा त्रास सहन करावा लागला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

पागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय.. डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार पागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय.. डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार Reviewed by News1 Marathi on June 16, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads