Header AD

केंद्रातील सरकारने पेट्रोल - डीझेल वरिल टॅक्स कमी करावा - नसीम खानठाणे , प्रतिनिधी  :  आधीच कोरोना निर्बधांमुळे बेजार झालेला सर्वसामान्य जनता 100 पार केलेल्या पेट्रोल-डीझेल दरवाढीमुळे हैराण झाले असून केंद्र सरकारने पेट्रोल-डीझेलवरील लावलेला कर कमी कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली.           महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीने पेट्रोल-डीझेलच्या वाढत्या दरवाढीच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रात आज सकाळी 11 वाजता राज्यातील विविध पेट्रोल पंपावर निदर्शने केली ठाण्यातील तीन पेट्रोल पंपावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व माजी मंत्री नसीम खान याच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले .         या प्रसंगी ठाणे काँग्रेस अध्यक्ष अॅड.विक्रांत चव्हाण,प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे,तारीक फारुकी,जिल्हा इंटक काॅग्रेस अध्यक्ष सचिन शिंदे,प्रदेश सदस्य सुखदेव घोलप, राजेश जाधव, प्रदिप राव,मोहन तिवारी,महेंद्र म्हात्रे, मिलिंद खराडे,झिया शेख,संदिप शिंदे,रविंद्र कोळी,प्रसाद पाटील,राहुल पिंगळे,मंजूर खत्री,महिला अध्यक्षा शिल्पा सोनोने,रेखा मिरजकर,निर्मला जोशी,विनय विचारे,मनोज पांडे,गिरीश कोळी आदि पदाधिकारी उपस्थित होते.            या प्रसंगी बोलताना नसीम खान यांनी सागितले की,2014 मध्ये काँग्रेसचे सरकार असताना जागतीक क्रूड ऑईलचा दर 104 रूपये होता तरिही त्यावेळेस तत्कालीन सरकारने पेट्रोल-डीझेलचे दर 80 रूपये ठेवून सर्वसामान्य जनतेला दिलासा दिला होता आता तर जागतीक क्रूड ऑईल चे दर 63 रूपये एवढा खाली आला तरीही भा.ज.पा.शासित केंद्र सरकारने  हा दर 104 वर आणला आहे .           या करिता सरकारने जो टॅक्स लावला आहे तो कमी केला तर निश्चितच पेट्रोल-डीझेलचे भाव कमी होतील परंतु हे सरकार गरिबांचे, सर्व सामान्य जनतेच नसून काही मूठभर श्रीमंतीचे आहे हे आता दिसत आहे या पेट्रोल-डीझेल दरवाढी मूळे जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले असून आधीच कोरोणाची लढाई लढताना आलेले लाॅकडाऊन व त्याबरोबर हि पेट्रोल-डीझेलच्या भाववाढीमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे,काँग्रेस आता गप्प बसणार नाही आम्ही नेहमीच गरीब,सर्वसामान्य जनतेच्या बाजूने असून ह्या दरवाढी संपूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन सुरूच राहील असे त्यांनी शेवटी सांगितले.            ठाण्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी तत्वज्ञान विद्यापीठ येथील पेट्रोल पंपावर तसेच विटावा येथील पेट्रोल पंप वर निदर्शने केली.

                             

केंद्रातील सरकारने पेट्रोल - डीझेल वरिल टॅक्स कमी करावा - नसीम खान केंद्रातील सरकारने पेट्रोल - डीझेल वरिल टॅक्स कमी करावा - नसीम खान Reviewed by News1 Marathi on June 07, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण पूर्वेत भाजपा महिला आघाडीच्या वतीने डोंबिवली सामूहिक बलात्कार घटनेचा निषेध कोळसे वाडी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत दिले निवेदन

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   डोंबिवलीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले आहेत. आज कल्याण पूर्वेत भाजपा महिला आघाडीच्या वती...

Post AD

home ads