Header AD

एंजेल ब्रोकिंग द्वारे 'स्मार्ट स्टोअर'चा शुभारंभ

 मुंबई, २४ जून २०२१ : भारतीय ट्रेडर्सना तंत्रज्ञान आधारीत शोध सोपा होण्याकरता, एंजेल ब्रोकिंगने आता अत्याधुनिक नियम-आधारीत समाधानांची यंत्रणा- 'स्मार्ट स्टोअर'ची सुरुवात केली आहे. नव्याने शुभारंभ केलेली इकोसिस्टिम फिनटेक आधारीत उत्पादनांसाठी मार्केटप्लेस म्हणून काम करेल. यात नियम आधारीत गुंतवणूक समाधान आणि गुंतवणूक शिक्षण सेवांचाही समावेश असेल. स्मार्ट स्टोअरमध्ये ट्रेडर्सना परस्पर संवाद साधण्यासाठी सोशल फोरमचीही सुविधा असेल.प्रभावीपणे ट्रेडिंग करण्याकरिता लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचे काम एंजेल ब्रोकिंगने हाती घेतले असून त्यासाठी निवडक सेवांची यंत्रणा तयार केली आहे. यात नियम-आधारीत गुंतवणूक उत्पादनांचा समावेश असून याद्वारे गुंतवणूकदार त्यांच्या ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटजी ठरवू शकतील. एंजेल ब्रोकिंगचे ग्राहक स्मार्ट स्टोअरद्वारे या सेवांविषयी जागरूक होऊन या सेवा वापरू शकतात. फिनटेक स्टार्टअप्स, उद्योजक आणि वित्तीय संस्थादेखील नव्याने लाँच झालेल्या प्लॅटफॉर्मवर त्यांच्या सेवा देऊ शकतात.एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे चीफ ग्रोथ ऑफिसर श्री. प्रभाकर तिवारी म्हणाले, “नियम आधारीत ट्रेडिंग हा एक महत्त्वपूर्ण सेगमेंट भारतात वेगाने लोकप्रियता मिळवत आहे. आमच्या स्मार्ट स्टोअरच्या शुभारंभाद्वारे आम्ही याच्या प्रसारात मदत करत आहोत. सर्व फिनटेक कंपन्यांना त्यांच्या सेवा नव्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही आवाहन करत आहोत. जेणेकरून या सेवा सर्वांना सहजपणे उपलब्ध होतील. त्याच वेळेला, नव्या आणि अनुभवी ट्रेडर्सना योग्य समाधानाद्वारे त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठीही आमंत्रित करतो.”एंजेल ब्रोकिंगचे सीईओ, श्री नारायण गंगाधर म्हणाले, "भारतीय शेअर बाजार हा सध्या शीर्षस्थानी असून पुढील काही वर्षात तो आणखी वृद्धी करेल, असा अंदाज आहे. त्यामुळे इथून पुढे गुंतवणूकदार आणि ट्रेडर्स या दोघांसाठीही अमर्याद संधी उपलब्ध आहेत. तंत्रज्ञानाचा लाभ घेत एंजेल ब्रोकिंगने सेवांचा एक पूर्ण समूह तयार केला असून याद्वारे त्यांच्या सर्व ग्राहकांना त्यांच्या गुंतवणुकीतून उत्कृष्ट परतावा मिळवता येईल. स्मार्ट स्टोअरच्या माध्यमातून, आधुनिक सेवांची पूर्ण यंत्रणा उभारून आम्ही हा दृष्टीकोन पुढील पातळीवर नेऊ इच्छितो. आमचा विश्वास आहे की, तंत्रज्ञानामुळे हा बदल आणखी सुधारेल आणि या आघाडीवर कोणतीही उणीव ठेवणार नाही.”

एंजेल ब्रोकिंग द्वारे 'स्मार्ट स्टोअर'चा शुभारंभ एंजेल ब्रोकिंग द्वारे 'स्मार्ट स्टोअर'चा शुभारंभ Reviewed by News1 Marathi on June 24, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads