Header AD

कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांना पंन्नास टक्के अनुदानावर बी बीयाणे वाटप बळीराजा सुखावला

 


                            
कल्याण , कुणाल म्हात्रे  :  कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांना सालाबादप्रमाणे यंदाही  कल्याण पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या वतीने ५० टक्के अनुदान तत्वावरवर 'जया' आणि श्रीराम 'या भात बियाणांचे वाटप सभापती अनिता वाकचौरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसभापती किरण ठोंबरे, माजी उपसभापती पांडुरंग म्हात्रे उपस्थित होते.


                    कोरोनाच्या भंयकर संकटात ज्या प्रमाणे इतर सर्व क्षेत्रे बाधित झाली आहेत, त्याच प्रमाणे कृषी क्षेत्र देखील अडचणीत आले आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेले भात पीक कुजले. तर यातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवड केली. 
             कल्याण, उल्हासनगर, बिर्ला गेट, टिटवाळा अशी हुकमी बाजारपेठ जवळपास असल्याने चांगला भाव मिळून चार पैसे मिळतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. पण यातच कोरोना आला. शासनाच्या कडक लॉकडाऊणमुळे भाजीपाला कवडीमोल दराने विकावा लागला. तर काहींचा शेतातच सडला. त्यामुळे शेतकरी वर्गाचे पूरते कंबरडेच मोडले आहे. आता या पावसाळ्यात तर भात पीक चांगले यावे ऐवढीच माफक अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.                सध्या स्थितीला कल्याण तालुक्यात ६ हजार ५९२ चौ. हेक्टर क्षेत्रात भात पिक घेतले जाते. तर ३५० हेक्टर वर भाजीपाला लागवड केली जाते. हे लक्षात घेऊन कल्याण पंचायत समितीच्या कृषी विभागाने दरवर्षीप्रमाणे जया ६८:२५ क्टिंटल तर श्रीराम ४० क्टिंटल भाताचे बियाणे जे ५० टक्के अनुदानावर उपलब्ध केले आहेत. त्याचे वाटप नुकतेच कल्याण पंचायत समितीच्या सभापती श्रीमती अनिता वाकचौरे यांच्या हस्ते केले. 


         
                 यावेळी उपसभापती किरण ठोंबरे, माजी उपसभापती पांडुरंग म्हात्रे, लाभार्थी शेतकरी व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या भात बियाणांचा लाभ घ्यावा असे अवाहन सभापती अनिता वाकचौरे व उपसभापती किरण ठोंबरे यांनी  केले आहे.
कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांना पंन्नास टक्के अनुदानावर बी बीयाणे वाटप बळीराजा सुखावला कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांना पंन्नास टक्के अनुदानावर बी बीयाणे वाटप बळीराजा सुखावला Reviewed by News1 Marathi on June 07, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads