Header AD

डोंबिवलीत ओबीसी सेलचे आंदोलन ... आमदार रवींद्र चव्हाणां सह शेकडो कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

 
डोंबिवली शंकर जाधव )  राज्य सरकारने ओबीसी आरक्षण बाबत जी पावले उचलणे अपेक्षित होती ती उचलली नाहीत.पंधरा महिने वेळकाढू धोरण घेतले त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात ओबीसींची बाजू भक्कम पणे मांडता आली नाही त्यामुळे ओबीसींच्या हक्काचे आरक्षण बाद झाले. या महाआघाडी ठाकरे सरकारच्या अकार्यक्षम कारभार विरोधात भाजपा ओबीसीसेल तर्फे राज्यभर निषेध जेलभरो आंदोलन झाले.  त्याच प्रमाणे डोंबिवली पूर्व औद्योगिक विभागातील देशमुख होम (टाटा लाईन) येथे भाजपने जेलभरो आंदोलन केले. भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात शेकडो कार्यकर्त्यांनी ठाकरे सरकार विरोधात घोषणाबाजी केल्यानंतर अखेर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
    

         ओबीसी आंदोलनामुळे शहरातील कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होतो की काय अशी चर्चा शहरात काल शुक्रवारपासून होत असल्याने जेलभरो आंदोलन ठिकाणी वेळअगोदरच सकाळपासून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनकर्त्यापूर्वीच पोलीसांचा फौजफाटा होता. त्यानंतर आमदार रवींद्र चव्हाण आणि आंदोलनकर्ते देशमुख होम परिसरातील भाजप जनसंपर्क कार्यालयात दाखल झाले. त्या ठिकाणी आंदोलनाची रूपरेषा आखल्यानंतर राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून नंतर ठाकरे सरकार विरोधात घोषणाबाजी करीत रस्त्यावर येऊन रस्ता जाम केला. 

         यामध्ये कल्याण जिल्ह्याध्यक्ष शशिकांत कांबळे,भाजप डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष नंदू परब,ओबीसी सेल कल्याण जिल्हाध्यक्ष  लक्ष्मण पाटील,उपाध्यक्ष दिनेश जाधवनंदू जोशीमाजी नगरसेवक नितीन पाटीलभोईर, मोरश्वर चंद्रकांत पाटीलसाई शेलारपंढरीनाथ म्हात्रेमहिला मोर्चा डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्षा पूनम पाटीलडोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्षा मनीषा राणेपंढरीनाथ म्हात्रे, अमित चिकणकर,मितेश पेणकर, वर्षा परमार,यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मारून ओबीसीनां आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. अखेर पोलिसांनी आमदार चव्हाणांसकट सर्वांना ताब्यात घेतले.


डोंबिवलीत ओबीसी सेलचे आंदोलन ... आमदार रवींद्र चव्हाणां सह शेकडो कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात डोंबिवलीत ओबीसी सेलचे आंदोलन ... आमदार रवींद्र चव्हाणां सह शेकडो कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात Reviewed by News1 Marathi on June 26, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads