Header AD

भर पावसातही महापालिका आयुक्तांनी केली नालेसफाई कामाची पाहणी

 


■नालेसफाई, रस्ते दुरुस्ती कामाची पाहणी करताना महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा सोबत इतर अधिकारी.                                            


ठाणे, प्रतिनिधी  ;  ठाणे महापालिकेच्यावतीने मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सर्व अत्यावश्यक कामे करण्यात आली असून आज दुसऱ्या दिवशीही भर पावसात महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी शहरातील नालेसफाई तसेच रस्ते दुरुस्ती कामाची पाहणी केली. दरम्यान दिनांक 9 जून ते 12 जून, 2021 या काळात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे. आज सकाळी 11.00 वाजता महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी वंदना बस डेपो येथून नालेसफाई तसेच रस्ते दुरुस्ती कामाची पाहणी करण्यास सुरूवात केली.


                   या पाहणी दौऱ्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष गटनेते नजीब मुल्ला, क्रीडा व सांस्कृतिक कार्य सभापती प्रियांका पाटील, उथळसर प्रभाग समिती अध्यक्षा वहिदा खान, कळवा प्रभाग समिती अध्यक्षा सौ.वर्षा मोरे, नगरसेवक संजय वाघुले, सुधीर कोकाटे, सुहास देसाई, उमेश पाटील, गणेश कांबळे, नगरसेविका सौ.प्रतिभा मढवी, सौ.नम्रता कोळी, सौ.अंकिता शिंदे, श्रीमती प्रमिला केणी, सौ.अपर्णा साळवी, सौ.अनिता गौरी, सौ.पूजा करसुळे, सौ.विजया लासे, सौ. मंगल कळंबे, कु.आरती गायकवाड, अतिरिक्त आयुक्त (2) संजय हेरवाडे, उप आयुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, मनीष जोशी, नगर अभियंता रवींद्र खडताळे, अतिरिक्त नगर अभियंता अर्जुन अहिरे, वैद्यकीय अधिकारी बालाजी हळदेकर तसेच इतर महापालिका अधिकारी उपस्थित होते.                 महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी वंदना बस डेपो, शिवप्रसाद, आंबेडकरनगर, एम. एच. हायस्कूल, सिडको क्रीक रोड, सरस्वती स्कूल राबोडी,  साकेत नाला, सह्याद्री नाला, दत्तवाडी तसेच शनिमंदिर साईनाथनगर आदी नाल्याची पाहणी केली. आवश्यक त्या ठिकाणी नाल्याची रुंदी वाढविणे, खोली वाढविणे, खाडीच्या मुखाजवळ नाले रुंद करणे तसेच कचरा व सुकलेला गाळ त्वरित उचलण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागास दिल्या.


                दरम्यान दिनांक 9 जून ते 12 जून, 2021 या काळात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असल्याने ठाणे महापालिकेच्यावतीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे. तसेच सद्यस्थितीत कोरोनाचा संसर्ग कमी होवून ठाणे शहर लेव्हल 2 मध्ये असले तरी देखील नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. 

भर पावसातही महापालिका आयुक्तांनी केली नालेसफाई कामाची पाहणी भर पावसातही महापालिका आयुक्तांनी केली नालेसफाई कामाची पाहणी Reviewed by News1 Marathi on June 08, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्म दिन सेवा सप्ताह अंतर्गत महिला स्वसंरक्षण ( Self Defence ) शिबिर संपन्न

ठाणे, प्रतिनिधी  :   पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जन्मदिन सेवा सप्ताहाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिका महिला व बालकल्याण विभाग व डॉ. राजेश मढवी...

Post AD

home ads