Header AD

डोंबिवलीत सापडला पांढऱ्या रंगाचा कावळा

 डोंबिवली शंकर जाधव ) डोंबिवली जवळील उंबर्ली हे गाव कावळ्याचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे.मात्र आता  डोंबिवलीत पेंडसे नगर परिसरात एक पांढऱ्या रंगाचा कावळा वावरताना डोंबिवली तील नागरिकांना आढळून आल्याने सर्वाना आश्चर्य वाटत आहे.पॉज संस्थेला याची माहिती मिळाल्यावर पांढऱ्या रंगाच्या कावळ्याला पोज संस्थेच्या मुरबाड येथील हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी करण्यात आले आहे. 
     डोंबिवली पूर्वेकडील महेश वीलाआंध्र बँक जवळ पक्ष्यांचा किलबिलाट चालू होता. तेव्हा हितेश शहा ह्यांना आढळून आला.त्यांनी पॉज हेल्पलाईनला फोन केला.संस्थेचे निलेश भणगे यांनी त्वरित धाव घेत त्याला बाकी कावळ्याच्या पांढऱ्या रंगाचा कावळ्याला मारातून वाचवले. 
      शहा यांच्या घराजवळ येणाऱ्या पाखरांमध्ये  एक वेगळाच पक्षी असल्याचे आढळले.कुतूहल म्हणून त्यांनी निरीक्षण केलंतेव्हा त्या पक्ष्याची ठेवण चोच आणि डोळे हे कावळ्या सारखेच असल्याचे त्यांच्या लक्षात आले.त्याचा आवाज ऐकल्यावर तो कावळाच असल्याची खात्री त्यांना पटली अशी माहिती पॉज संस्थेतर्फे देण्यात आली.अशा प्रकारचा कावळा क्वचितच आढळतो. 

       पांढरा कावळा ही कोणतीही नवीन प्रजाती नसून अनुवंशिक स्थितीमुळे होणारे एक उत्परिवर्तन आहे.पक्षी प्राण्यांच्या शरीराचे रंग विशिष्ट द्रव्यांमुळे ठरतात.ही रंगद्रव्ये मेलानिनकॅरेटीनोईड आणि पॉरफिरीनसया प्रकारची असतात.या तीनही रंगद्रव्यांची कमी - जास्त किंवा पूर्णपणे कमतरता पक्ष्यांची रंगसंगती ठरवते किंवा बिघडवू शकते असे पॉजचे संचालक निलेश भणगे यांनी सांगितले.
        यापैकी मेलानिनचा या रंगद्रव्याच्या कमतरते मुळे पिसे पूर्ण पांढऱ्या रंगाची होतात. कावळ्याबाबत असे झाले असावेअसे पक्षीमित्र निलेश यांनी सांगितले.

डोंबिवलीत सापडला पांढऱ्या रंगाचा कावळा डोंबिवलीत सापडला पांढऱ्या रंगाचा कावळा Reviewed by News1 Marathi on June 29, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads