Header AD

६फुटी अजगराला वॉर रेस्क्यू फाउंडेशनने दिले जीवनदान

 कल्याण ,  कुणाल  म्हात्रे  ६ फुटी अजगराला वॉर रेस्क्यू फाउंडेशनने जीवनदान दिल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. गेल्या ४८ तासात पडलेल्या मुसळधार पावसामुळे सर्व ठिकाणी पाणी भरले होते. बिळात पाणी शिरल्यामुळे सगळे सरपटणारे जीव मानवी वस्तीत शिरले.  शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास हाजीमलंग गडाच्या पायथ्याशी राहणारे श्री. म्हात्रे ह्यांच्या अंगणात ६  फुटी भारतीय अजगर आढळून आला. 


             तेव्हा त्यांनी वॉर रेस्क्यू फाउंडेशनच्या हेल्पलाइन वर कॉल केला. यावेळी सर्पमित्र कुलदीप चिकनकर, राज गायकर, मुंबई पोलीस मुरलीधर जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली व अजगराला सुरक्षित पकडून कल्याण वनविभागाच्या स्वाधीन केले. त्या वेळेस वनपाल मच्छिंद्र जाधव व वन रक्षक रोहित भोई उपस्थित होते.  लवकरच त्याला निसर्ग मुक्त करण्यात येईल असे वनपाल मच्छिंद्र जाधव यांनी सांगितले.

६फुटी अजगराला वॉर रेस्क्यू फाउंडेशनने दिले जीवनदान ६फुटी अजगराला वॉर रेस्क्यू फाउंडेशनने दिले जीवनदान Reviewed by News1 Marathi on June 13, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

    डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसां...

Post AD

home ads