Header AD

अपघाताची संख्या शून्यावर आणण्यासाठी डोंबिवलीत 'वाहतुक स्वयंसेवक' संकल्पना कार्यान्वित


 डोंबिवली शंकर जाधव ) वाहतुकीचे नियोजन व्हावे व अपघातांची संख्या शून्यावर यावी व वाहतुक नियमांचे पालन व्हावे याकरीता सामान्य नागरीकांचा जास्तीत जास्त सहभाग व्हावा यासाठी 'वाहतुक स्वयंसेवकही संकल्पना शहरात सुरू करण्यात आली. डोंबिवली मुख्य वाहतूक कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात पोलीस उपआयुक्त बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले.त्यांनी सहभागी कार्यकर्त्यांना याबाबतची माहिती व शुभेच्छा दिल्या.
 

         यावेळी कल्याण विभागचे वाहतुक शाखा सहाय्यक पोलीस आयुक्तउमेश मानेडोंबिवली पोलीस निरीक्षक उमेश गित्तेराजश्री शिंदे आदी वाहतूक पोलीस अधिकारी उपस्थित होते.पोलीस उपआयुक्त बाळासाहेब पाटील यांनी संकल्पनेचा उद्देश स्पष्ट करतांना सांगितले कीया संकल्पने अंतर्गत जो उपक्रम हाती घेण्यात आला आहे त्याचे मूळ उद्दिष्ट वाहतुक नियमन व रस्ते सुरक्षा संदर्भात स्थानिक पातळीवर जनजागृती करणेलोकसहभागातून वाहतूक नियमन करणेवाहतुकीची शिस्त राबविणे व समाजाभिमुख कार्याची जाणीव निर्माण करणे हा आहे. 

         सहाय्यक पोलीस आयुक्तकल्याण विभाग यांच्या मार्गदर्शना खाली 'वाहतुक स्वयंसेवकही संकल्पना शहर वाहतुक उपशाखा डोंबिवली तर्फे राबविण्यात आली असून वाहतुक स्वयंसेवकसंकल्पने अंतर्गत शहर वाहतुक उपशाखा डोंबिवली येथे २२ स्वयंसेवक हे त्यांच्या सुविधेनुसार दोन तास वाहतुक नियमनाकरीता वाहतुक पोलीसांना मदत करणार आहेत.

      बुधवारी पोलीस उपायुक्त वाहतुक ठाणे शहर बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते डोंबिवली येथील २२ वाहतुक स्वयंसेवकांना 'वाहतुक स्वयंसेवकअसे लिहिलेले टी-शर्टटोपी व मास्क देण्यात आले.यावेळी वाहतुक उपशाखा डोंबिवलीचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी आवाहन केले कीशहरातील सुजाण नागरीकांनी या संकल्पनेमध्ये सहभागी होऊन जनजागृती करावी व वाहतुक पोलीसांना मदत करावी.

अपघाताची संख्या शून्यावर आणण्यासाठी डोंबिवलीत 'वाहतुक स्वयंसेवक' संकल्पना कार्यान्वित अपघाताची संख्या शून्यावर आणण्यासाठी डोंबिवलीत 'वाहतुक स्वयंसेवक' संकल्पना कार्यान्वित Reviewed by News1 Marathi on June 30, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads