Header AD

शिवसेना आणि आई फाउंडेशनच्या माध्यमातून गरजू कुटुंबांना मदतीचा हात
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कोरोना आणि लॉकडाऊन काळात रोजगार गेल्याने अनेकांवर कठीण परिस्थिती ओढावली आहे. अशा गरजू कुटुंबव्यक्तींना शिवसेना आणि आई फाउंडेशनच्या माध्यमातून मदतीचा हात देण्यात आला. काही जणांना आर्थिक मदत तर काही कुटुंबांना अत्यावश्यक वस्तूंच्या किटचे यावेळी वाटप करण्यात आले.


एक हाथ मदतीचा या संकल्पनेतुन शिवसेना उपशहर संघटक दिलीप दाखिनकर आणि आई फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने हा सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहे. आतापर्यंत 800 हून अधिक गरजू कुटुंबांना या उपक्रमाद्वारे मदत करण्यात आल्याची माहिती दिलीप दाखिनकर यांनी दिली.


यावेळी माजी नगरसेवक महेश गायकवाडउपशहरप्रमुख हर्षवर्धन पालांडेमाजी सरपंच राहुल पाटीलविभागप्रमुख रामदास ढोणेसुभाष ढोणेसदाशिव पाटीलरवींद्र उतेकरगणेश पवाररवींद्र खांदोडेसचिन पवारउदय शिंदे आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.

शिवसेना आणि आई फाउंडेशनच्या माध्यमातून गरजू कुटुंबांना मदतीचा हात शिवसेना आणि आई फाउंडेशनच्या माध्यमातून गरजू कुटुंबांना मदतीचा हात Reviewed by News1 Marathi on June 08, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads