Header AD

सर्प मित्राने दोन नागांसह धामणीला दिले जीवदान

 कल्याण , प्रतिनिधी  : कल्याणात  सोमवारी सर्पमित्राने दोन नागतसेच एका धामणीला पकडून जीवदान दिले. कल्याण पश्चिमेतील ऊंर्बेड गावातील अमर भंडारी यांच्या कोंबड्याच्या खुराड्यात दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सहा फुटी लांब नाग आढळल्याने उपस्थितीताची भितीने धांदल उडाली. तातडीने घटनास्थळी सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी पोहचत सहा फुटी पुर्ण वाढ झालेल्या विषारी नागास पकडल्याने उपस्थितीतांचा जीव भांड्यात पडला.            कल्याण पश्चिमेतील महाराष्ट्र नगर परिसरातील चायनीजच्या गाडीच्या खोक्यात साडे सहा फुटी नाग जाऊन बसल्याचे रहिवाशी अजित यांना आढळल्याने दुकानदारासह बघ्यांची पाचावर धारण झाली. सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी चार वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी तातडीने पोहचत विषारी नागाला पकडल्याचे पाहुन उपस्थितीनी सुटकेचा निश्वास टाकला.            

         

                          

तर  कल्याण पश्चिमेतील हिना गार्डन परिसरातील मंगेशी सुष्टी सोसयटीच्या आवारात पाच वाजण्याच्या सुमारास नऊ  फुटी साप दिसल्याने सोसयटीच्या रहिवाशामध्ये पळता भुई उडाली. सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी घटनास्थळी पोहचत नऊ फुटी धामण या बीन विषारी सापास पकडुन धामण सापा बाबतीत उपस्थित रहिवाशांमध्ये जनजागृती केली.  दोन दिवस कोसळलेल्या पावासामुळे सापाची बीळे पाण्याने भरल्यामुळे साप हे सुरक्षित आडोसासाठी सापांनी आसारा घेतला आसावा,     "पकडलेल्या दोन नागएक धामण यांना वन विभागाच्या ताब्यात देऊन ते जंगलात  नैसर्गिक अधिवासात सोडणार असल्याचे सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी सांगितले.

सर्प मित्राने दोन नागांसह धामणीला दिले जीवदान सर्प मित्राने दोन नागांसह धामणीला दिले जीवदान Reviewed by News1 Marathi on June 14, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खड्ड्यात पडून शिवसेना शाखा प्रमुख जखमी...

  डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी  हो...

Post AD

home ads