Header AD

भिवंडी शहरातील नाले सफाईचे तीनतेरा, पहिल्याच पावसात सखल भागात, रोडवर पाणीच पाणी, बाजार पेठेतील दुकानात शिरले पाणी, महापालिकेचे दुर्लक्ष...

 



भिवंडी दि 05 (प्रतिनिधी ) शहरात महापालिकेने मोठा गाजावाजा करून नेलेसफाईचे काम हाती घेऊन ठेकेदारमार्फत सुरु केले असून मात्र ठेकेदार आणि महापालिका अधिकारी नाळेसफाई यांच्या गलथान कारभार पहिल्याच पावसात उघड झाला असून फक्त एक तास पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील तीनबत्ती बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून 25 पेक्षा जास्त दुकानात पाणी शिरले असून नालेसफाई व्यवस्थित न झाल्याने नाल्यातील घाणपाणी रोडवर येऊन दुकानात शिरल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे तर कल्याण रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी येऊन वाहू लागल्याने वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे, महत्वाची बाब म्हणजे नालेसफाई व्यवस्थित होत नसल्याचे आरोप नागरिकांनी केले होते त्यावर आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी  चांगले काम न करणाऱ्या ठेकादारांचे बिल देण्यात येणार नसल्याचा इशारा दिला होता मात्र पहिल्याच पावसात नालेसफाईच पोलखोल झाल्याने आयुक्त काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे...



भिवंडी शहरातील मुसळधार पावसात लग्नाच्या मंडपात पाणीच पाणी, वऱ्हाड्यांची झाली फजिती...


          
           भिवंडी शहरात एक तास मुसळधार पाऊस झाल्याने नालेसफाई न झाल्याने बहुसंख्य भागात पाणी साचले असताना शहरातील आमपाडा परिसरात लग्नाचा कार्यक्रम सुरु असताना पावसाचे पाणी थेट लग्नं सुरु असलेल्या मंडपात शिरल्याने वऱ्हाडी मंडळींची एकच धावपळ झाली तर त्यांचे जेवण सुद्धा भिजल्याने चांगलीच फजिती झाली असून तब्बल एक तास खुच्यावर पाय ठेवून ताटकळत बसावे लागले आहे तर कोरोनाच्या नियमा प्रमाणे फक्त 25 नागरिकांना परवानगी असताना देखील मोठी गर्दी पाहवयास मिळाली आहे...
भिवंडी शहरातील नाले सफाईचे तीनतेरा, पहिल्याच पावसात सखल भागात, रोडवर पाणीच पाणी, बाजार पेठेतील दुकानात शिरले पाणी, महापालिकेचे दुर्लक्ष... भिवंडी शहरातील नाले सफाईचे तीनतेरा, पहिल्याच पावसात सखल भागात, रोडवर पाणीच पाणी, बाजार पेठेतील दुकानात शिरले पाणी, महापालिकेचे दुर्लक्ष... Reviewed by News1 Marathi on June 05, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्म दिन सेवा सप्ताह अंतर्गत महिला स्वसंरक्षण ( Self Defence ) शिबिर संपन्न

ठाणे, प्रतिनिधी  :   पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जन्मदिन सेवा सप्ताहाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिका महिला व बालकल्याण विभाग व डॉ. राजेश मढवी...

Post AD

home ads