Header AD

भिवंडीतील धामणकर नाक्याच्या पुढचा मार्ग निश्चित नसल्याने मेट्रोचे काम रखडले..

 भिवंडी दि.२९ (प्रतिनिधी ) वाहतूक कोंडी  ठाणे होणारा त्रास  टाळण्यासाठी,ठाणे - भिवंडी - कल्याण मेट्रो प्रकल्प -५ मधील दुसऱ्या फेजमधील भिवंडी कल्याण मार्गाचा विकास आराखडा अजूनही बासनात असल्याने ठाणे - भिवंडी या पहिल्या फेजमधील काम सुमारे ६० टक्के पूर्ण होत आले असताना पुढील काम अडखळत सुरू आहे.         सध्या तरी ठाणे - भिवंडी - कल्याण मेट्रो भिवंडीत अडकली आहे. धामणकर नाक्यापर्यंत मेट्रोचे काम मोठ्या ताकदीने व जलद गतीने करण्यात आले आहे मात्र त्यापुढे हे काम सरकले नसल्याने मेट्रो प्रकल्पाचे काम याच ठिकाणी येऊन थांबले आहे .           ठाणे - बाळकुम ,भिवंडी - कल्याण नाकामार्गे कल्याण या २४.९० कि.मी.लांबीच्या मार्गासाठी ८४१६ . १५ कोटी रुपये खर्च केल्या जाणाऱ्या या मार्गाचा भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.परंतू भिवंडी शहरातील मार्ग आज ही निश्चित झालेला नसल्याने मेट्रो जाणार कोठून ?         हा प्रश्न उपस्थित होत आहे.या मेट्रोचे नियोजित भिवंडी शहरातील मार्ग अंजुरफाटा , धामणकर नाका , कल्याण नाका येथून रांजणोली नाकामार्गे कल्याणच्या दिशेने जाणार होती परंतू  त्याच दरम्यान कल्याण नाका ते रांजणोली नाका दरम्यान एमएमआरडीएने उड्डाणपूल बनविल्याने या मार्गावर पुन्हा मेट्रोसाठी मोठ्या प्रमाणावर रस्ता रुंदीकरण करण्याची गरज आहे.        त्यास येथील व्यापारी व स्थानिक निवासी नागरिक या सर्वांचाच विरोध होत आहे .त्यामुळे भिवंडी वंजारपट्टी नाका पोगाव मार्गे मेट्रो मार्ग वळविण्याचा एक पर्याय समोर आला आहे परंतू तो खर्चिक व कमी उपयोगात येणार असल्याने त्यास आजही प्रतिसाद मिळाला नाही.

        

              भिवंडीतून जाणाऱ्या या मेट्रोचे काम ठाणे बाळकुम ते भिवंडीतील धामणकर नाकापर्यंत काम युद्ध पातळीवर सुरू आहे.काही ठिकाणी पिलर व त्यावरील आडव्या तुळई टाकून काम पूर्ण होत आले आहे.             पण त्यापुढे धामणकर नाका ते कल्याणच्या दिशेने जाणारा मार्ग अजून ही निश्चित नसून त्या कामाबाबत निविदा प्रक्रिया सुध्दा सुरू झाली नसल्याने मेट्रो १८ ऑक्टोबर २०१९ रोजी सुरू झालेला हा प्रकल्प २०२२ मध्ये पूर्णत्वास जाणार होता परंतू ठाणे येथून सुरू झालेले काम भिवंडीतील धामणकर नाकापर्यंत येऊन थांबल्याने या कालावधीत पूर्ण होईल का ?           याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. भिवंडीकरांच्या मेट्रो प्रवासाचे स्वप्न पूर्ण होण्यास अजून नेमकी किती कालावधी लागणार याकडे नागरीकांचे लक्ष लागून राहिले आहे .
भिवंडीतील धामणकर नाक्याच्या पुढचा मार्ग निश्चित नसल्याने मेट्रोचे काम रखडले.. भिवंडीतील धामणकर नाक्याच्या पुढचा मार्ग निश्चित नसल्याने  मेट्रोचे काम रखडले.. Reviewed by News1 Marathi on June 29, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads