Header AD

शिवसेनेने भाजपशी युती करण्याची प्रताप सरनाईक यांनी मांडलेली भूमिका स्वागतार्ह


■उद्धव ठाकरे यांनी  भाजपशी युती करण्याचा विचार करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले...मुंबई दि. 20 -  शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शिवसेना आणि भाजप ने युती करावी अशी  स्वागतार्ह भूमिका मांडली आहे.त्यांच्या या भूमिकेचे आपण स्वागत करीत असून उद्धव ठाकरे यांनी  महाराष्ट्राच्या विकासासाठी भाजपशी युती करावी असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले आहे.            काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जोडी च्या चक्रात उद्धव ठाकरे अडकले आहेत. दोन्ही कॉंग्रेस च्या दबावामुळे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना काम करणे अवघड होत आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी ; दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी; छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विचार मजबूत करण्यासाठी  शिवसेना भाजप ने एकत्र यावे असे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले आहे.               काँग्रेस आणी राष्ट्रवादी ला बाजूला सारून शिवसेने ने भाजप शी युती करावी ही आमदार प्रताप सरनाईक यांनी मांडलेली भूमिका अत्यंत योग्य आहे. शिवसेना भाजप च्या नेत्यांचे एकमेकांशी आजही आपुलकी चे नाते आहे. त्यामुळे पुन्हा भाजप शी युती करण्यास शिवसेने ला अडचण होणार नाही अशी प्रताप सरनाईक यांची सूचना योग्य आहे.             त्यांच्या सूचनेचा शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री म्हणूनही उद्धव ठाकरे यांनी विचार करावा. त्यांनी या पूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी शी युती करण्याचा घेतलेला निर्णय बदलावा. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे असते तर त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी शी युती करण्याचा निर्णय घेऊ दिला नसता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आपला निर्णय बदलून भाजप शी युती करावी असे आवाहन ना रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे यांना केले आहे. 

शिवसेनेने भाजपशी युती करण्याची प्रताप सरनाईक यांनी मांडलेली भूमिका स्वागतार्ह शिवसेनेने भाजपशी युती करण्याची प्रताप सरनाईक यांनी मांडलेली भूमिका स्वागतार्ह Reviewed by News1 Marathi on June 20, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

१.२५लाख वितरकांना कमाईची संधी देणार 'इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१' ११-१३ ऑगस्ट दरम्यान होणार आयोजन

मुंबई, २ ऑगस्ट २०२१:  भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. य...

Post AD

home ads