Header AD

टिटवाळ्या तील मराठी कलावंत उज्ज्वल धनगर यांचे निधन
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  मराठी रंगभूमीवरचित्रपट सृष्टी तसेच टिव्ही वरील   मराठी व हिंदी विविध मालिकांमध्ये काम केलेला आणि टिटवाळ्यातील रहिवासी असलेला  कलावंत उज्वल धनगर यांचे सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन दुःखद निधन झाले आहे. मृत्यू समयी त्याचे वय २९  वर्षे होते. या घटनेने मांडा-टिटवाळा शहरासह लगातच्या परीसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.मुळचा शहापूर तालुक्यातील सापगाव येथील रहिवासी असलेला उज्वल धनगर हा गेली १५ वर्षांपासून टिटवाळा येथे रहात होता. २००८ पासून फिल्मी दुनियेत पदार्पण करत  अनेक मराठी चित्रपटहिंदी-मराठी मालिका व नाटकांमध्ये आपल्या कलेचा ठसा त्याने उमटवला होता. तसेच विविध सांस्कृतिकसामाजिक व धार्मिक कार्यक्रमात तो अतिशय उत्कृष्ट असे सुत्रसंचलन करत असे. नेहमी आपल्या अदाकारीने व सुत्रसंचलनाने लोकांना हसविण्याचे काम करत असे. स्वराज्य रक्षक संभाजी राजे या मालिकेतील त्याची खाशाबा ही व्यक्ती रेखा प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. अशा प्रकारे अनेक मालिकांमध्ये त्याने अतिशय उत्कृष्ट भूमिका केलेल्या आहेत. 

टिटवाळ्या तील मराठी कलावंत उज्ज्वल धनगर यांचे निधन टिटवाळ्या तील मराठी कलावंत उज्ज्वल धनगर यांचे निधन Reviewed by News1 Marathi on June 28, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads