Header AD

कल्याण मध्ये सुरु झाली आठवणींचे झाड मोहीम

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  : पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कल्याणमध्ये आठवणींचे झाड या मोहीमेची सुरुवात कल्याण पूर्वेतील नेतिवली टेकडीवरील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या गुहेच्या परिसरात पिंपळ व कडूलिंबाच्या रोपणाने करण्यात आली.


कोरोना काळात आपल्या जवळच्या मित्र मंडळींना,  नाते वाईकांना ऑक्सीजन अभावी व कोरोनामुळे आपल्याला गमवावे लागले. आपल्या आप्तस्वकीयांची आठवण म्हणून,  किमान १ झाड लावण्याचे आवाहन जेष्ठ शिक्षक अंकुर आहेर आणि इकोड्राईव्ह यंगस्टर्स फाउंडेशन तर्फे करण्यात आले आहे. रेल चाईल्ड संस्था संचालित महात्मा गांधी विद्यामंदिरडोंबिवली (प.) तसेच इतिहास संकलन समितीडोंबिवली व इकोड्राईव्ह यंगस्टर्सकल्याण यांनी एकत्र येऊन, 'आठवणींची झाडेलावून त्याच्या संवर्धनाची जबाबदारी घेतली आहे.


आठवणींचे झाड या अभियानात सहभागी होत वृक्षारोपण करून 9773430684 या क्रमांकावर फोटो पाठविण्याचे आवाहन इकोड्राईव्ह यंगस्टर्स फाउंडेशन तर्फे महेश बनकर यांनी केले आहे.

कल्याण मध्ये सुरु झाली आठवणींचे झाड मोहीम कल्याण मध्ये सुरु झाली आठवणींचे झाड मोहीम Reviewed by News1 Marathi on June 07, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडीत लाखो रुपयांवर डल्ला मारणाऱ्या ग्रामसेविकेस निलंबित करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ठोकले ग्रामपंचायत कार्यालयास ठोकले टाळे...

भिवंडी दि 25 (प्रतिनिधी ) ग्रामपंचायतीं करीता राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजना अंतर्गत विकास कामांसाठी लाखो रुपये दिले जात अ...

Post AD

home ads