Header AD

नगरसेवक कृष्णा पाटील यांच्या मार्गदर्शना खाली श्रीरंग सोसायटी येथे कोव्हॅक्सीन लसीकरण मोहिम





ठाणे, दि. 15  ; 
संस्कार सेवाभावी संस्था तसेच सिद्धीविनायक हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 13 जून 2021 रोजी श्रीरंग सोसायटी येथे कोव्हॅक्सीन लसीकरण मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेचे आयोजन स्थानिक नगरसेवक कृष्णा पाटील तसेच नगरसेविका सौ. नंदा पाटील आणि शारदा संकल्प प्रतिष्ठान यांच्यामार्फत करण्यात आले.



        सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शारदा प्रतिष्ठानचे दादू पाटील, आमदार संजय केळकर, भाजपा शहर अध्यक्ष, आमदार निरंजन डावखरे, महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्यकारिणी सचिव संदिप लेले, भाजपा महिला आघाडी उपाध्यक्षा (महाराष्ट्र प्रदेश) सौ. माधवी नाईक, ज्येष्ठ भाजपा नगरसेवक संजय वाघुले, ठाणे शहर भाजपा सरचिटणीस विलास साठे, ठाणे भाजपा उपाध्यक्ष विक्रम भोईर, ठाणे भाजपा उपाध्यक्ष जयेंद्र कोळी, गोकुळनगर सिद्धेश्वर मंडळ अध्यक्ष विजय रेडेकर, वृंदावन राबोडी मंडळ अध्यक्ष योगेश भोईर, भाजपा युवा मोर्चा सचिव गणेश मोरे, युवा मोर्चा उपाध्यक्ष हितेश शिर्के, युवा मोर्चा कार्यकारिणी सदस्य सुरेश पवार, वृंदावन राबोडी भाजपा महिला अध्यक्षा सौ. गौरी देशमुख, भाजपा ठाणे शहर महिला कार्यकारिणी सदस्या सौ. कांचन पाटील, सुनिता जाधव, लिना भुजबळ, सीमा सावंत, प्रतिभा पांडे, रेश्मा पाटील, लिमये काकी, डॉ. ए. बी. पाटील, डॉ. वैभव आंब्रे, दीपक केशरवाणी, विनित सिंग, वैभव राणे, जयेश गायकवाड, राजेश झगडे, अक्षय झोडगे, विकास अच्छा, भाजपा युवा मोर्चा गोकुळनगर सिद्धेश्वर अध्यक्ष अक्षय पाटील आदी उपस्थित होते.



          लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी श्रीरंग सहनिवास सोसायटीचे ज्येष्ठ कार्यकर्ते शशिकांत परब, संतोष साळवी, दिलीप कागल, नंदकिशोर वैबुडे, प्रकाश कांबळी, गिरीधर परब, गजानन परब, पुंडलिक पुजारे, शशिकांत बारगोडे, सतिशचंद्र सावंत, शशांक हडपे, चेतन बांदेकर, संजय कशाळकर, विलास साने तसेच डॉ. योगेश गिते आणि सिद्धीविनायक हॉस्पिटलचे समस्त कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.



         सदर लसीकरण मोहिमेत प्रति लस 780 रुपये या सरकारी दराप्रमाणे दर आकारण्यात येणार होता परंतु शारदा संकल्प प्रतिष्ठान आणि सिटीझन को-ऑप. क्रेडिट सोसायटी यांच्या मार्फत 280 रुपयांचा भार उचलून नागरिकांसाठी प्रति लस 500 रुपयांत उपलब्ध करून देण्यात आली. 
नगरसेवक कृष्णा पाटील यांच्या मार्गदर्शना खाली श्रीरंग सोसायटी येथे कोव्हॅक्सीन लसीकरण मोहिम नगरसेवक कृष्णा पाटील यांच्या मार्गदर्शना खाली श्रीरंग सोसायटी येथे कोव्हॅक्सीन लसीकरण मोहिम Reviewed by News1 Marathi on June 15, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

१.२५लाख वितरकांना कमाईची संधी देणार 'इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१' ११-१३ ऑगस्ट दरम्यान होणार आयोजन

मुंबई, २ ऑगस्ट २०२१:  भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. य...

Post AD

home ads