Header AD

ब्रह्मांड कट्ट्यावर रंगली कला संस्कार संस्थे तर्फे आयोजित 'छत्री पेंटिंग कार्यशाळा' !

ठाणे,  प्रतिनिधी  :  समाजसेवेत तथा मनोरंजन क्षेत्रात अग्रेसर असलेल्या सुप्रसिद्ध ब्रह्मांड कट्टयाने विविध कलाप्रशिक्षणाच्या दृष्टिने पाऊल उचलले असून ऑनलाईन माध्यमाद्वारे १५ जून रोजी मोफत 'छत्री पेंटिंग कार्यशाळा' आयोजित केली होती. या कार्यशाळेत आर्टिस्ट वर्षा गंद्रे यांनी मार्गदर्शन तथा प्रशिक्षण दिले. ब्रह्मांड कट्टा अंतर्गत कलासंस्कार संस्थेच्या अध्यक्षा असलेल्या वर्षा यांचे शिक्षण सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् मधुन झाले असून टेक्स्टाईल पेंटिंग ही त्यांची खासियत आहे. पेपरमॅशे, मोल्डींग, रांगोळी, इकोफ्रेंडली गणेशमुर्ती बनविणे यातही त्या पारंगत आहेत.  या कार्यशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे लहान मुलांपासुन ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटाचे सदस्य या कार्यशाळेत सहभागी झाले होते.           सर्वप्रथम वर्षा यांनी विविध प्रकारचे पेंटिंग ब्रशेस्, रंग व त्यांचे उपयोग याचे सखोल विवरण केले. वेगवेगळया प्रकारच्या ब्रशेसच्या सहाय्याने मुक्तहस्त स्ट्रोक्स कसे द्यावेत  हे त्यांनी प्रात्यक्षिक करुन दाखविले. स्टेन्सिल कसे तयार करावे व छत्रीवर  नक्षीकामासाठी त्याचा कसा उपयोग करावा हे प्रभावीरित्या त्यांनी शिकवले. याचबरोबर डिज़ाइन मध्ये रंग कसे भरावे, रंगसंगती कशी असावी हेदेखील उत्तमप्रकारे शिकवले. या अनेकविध तंत्रांचा वापर करुन वर्षा यांनी छत्रीवर सुंदर फूले, पानडी, नक्षी अशी अनेक डिजा़इन्स बनवून सर्वांची मने जिंकली.              या कार्यशाळेला सर्व वयोगटातुन उत्तम प्रतिसाद लाभला. बालगोपाळांनी तर या कार्यशाळेचा मनमुराद आनंद लुटला. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून सक्रिय सहभाग दर्शवून सदस्यांनी आपल्या प्रश्नांचे शंकानिरसन करुन घेतले. ब्रह्मांड कट्टयाचे संस्थापक श्री. राजेश जाधव यांनी आर्टिस्ट वर्षा यांचे आभार मानले. सदस्यांचा सहभाग व आवड पहाता तसेच ज्ञानार्जनातील प्रगत पाऊल म्हणून ब्रह्मांड कट्टा अशा कार्यशाळा आयोजित करत राहील असे आवाहनही त्यांनी केले. या मोफत कार्यशाळा म्हणजे उत्तम कलाकार घडविण्यात कलासक्त ब्रह्मांड कट्टयाने उचललेला मोलाचा वाटा आहे यात वादच नाही.

ब्रह्मांड कट्ट्यावर रंगली कला संस्कार संस्थे तर्फे आयोजित 'छत्री पेंटिंग कार्यशाळा' ! ब्रह्मांड कट्ट्यावर रंगली कला संस्कार संस्थे तर्फे आयोजित 'छत्री पेंटिंग कार्यशाळा' ! Reviewed by News1 Marathi on June 17, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads