Header AD

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिना निमित्त भोपर परिसरात मास्क व सेनेटराईजचे वाटप

डोंबिवली ( शंकर जाधव )  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त शहरात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.कल्याण-डोंबिवली चे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ (आप्पा )शिंदे यांच्या सहकार्याने डोंबिवली येथील वार्ड क्रमांक ११४ भोपर येथे गजानन चौकामध्ये जनहितार्थ  जिल्हा सचिव एडवोकेट ब्रह्मा  माळी यांच्या प्रयत्नातून मोफत मास्क व सेनेटराईजचे  यांचे मोफत वाटप करण्यात आले.            यावेळी भोपर आणि आजूबाजूच्या परिसरातील गावांतील नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला यावेळी भोपर गावात वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला.जिल्हा सचिव एडवोकेट ब्रह्मा  माळी यासह अध्यक्ष योगेश डांगे,अभय भूगोल, निखिल शहा, अक्षय वांजले, अजिंक्य माळी, विश्वकर्मा सुरज शिर्के, मनीष कोळी आदी कार्यकर्त्यांनी अथक मेहनत घेतल्याने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिना निमित्त भोपर परिसरात मास्क व सेनेटराईजचे वाटप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या  वर्धापन दिना निमित्त भोपर परिसरात मास्क व सेनेटराईजचे वाटप Reviewed by News1 Marathi on June 10, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads