Header AD

भिवंडीत मुसळधार पावसामुळे सखल भाग जलमय ; अनेक दुकानांसह घरांमध्ये शिरले पाणी ; जनजीवन विस्कळीत, नाले सफाईचा पोलखोल..

 
भिवंडी दि.9 (प्रतिनिधी )  यावर्षी पावसाने वेळेवर येऊन बुधवारी पहाटेपासून जोरदार  धुमाकूळ घातला आहे.त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात पूरस्थिती निर्माण होऊन ठिकठिकाणी सखल भाग पाण्याखाली जाऊन जलमय झाला आहे.तर अनेक दुकांनासह घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाल्याचे पाहवयास मिळत असून सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे.भिवंडी शहर व ग्रामीण परिसरात पहाटे पासून  मुसळधार पाऊस कोसळत आहे.पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी शिरले आहे.            त्यामुळे भिवंडी परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून बहुतांश घरांमध्ये व दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे.शहरातील काही भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे तर यावर्षी नाले सफाईचा पहिल्याच पावसाने पोलखोल केल्याने   नाले ,गटारातील पाणी रस्त्यावर येऊन नागरिकांच्या घरात शिरले आहे.शहरातील निजामपुरा, कणेरी, कमला हॉटेल , नारपोली, पद्मानगर, तीनबत्ती, शिवाजी नगर, भाजीमार्केट,नजराना कंपाऊंड येथील सखल भागातील दुकाने, घरांमध्ये पाणी शिरल्याने व्यापारी व रहिवाशांचे खूपच हाल झाले आहेत. तीनबत्ती येथील भाजी मार्केटमध्ये भाजीपाला विक्रेत्यांचा भाजीपाला व अन्य वस्तू देखील वाहून गेल्या आहेत.            तर भाजीपाला व्यापाऱ्यांनी आपला भाजीपाला वाहत्या पाण्यात टाकून पाळायन केले आहे , महानगरपालिका हद्दीतील म्हाडा कॉलनी ,ईदगाहरोड येथील कामवारी नदीकाठी राहणाऱ्या रहिवाशांच्या झोपड्यांमध्ये पाणी शिरल्याने त्यांचे हाल झाले आहे  .दरम्यान पावसाचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे कल्याणरोड, अंजूरफाटा,रांजणोली बायपास नाका,माणकोली नाका, वंजारपट्टीनाका,नारपोली,नझराना सर्कल,भिवंडी - वाडा रोडवरील नदीनाका अशा विविध मार्गावरील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती.           महत्वाची बाब म्हणजे महापलिकेच्या आरोग्य निरीक्षिका  सुविधा चव्हाण यांनी नाल्यात उतरून फोटो व्हिडिओ सेशन करून प्रचंड   व्हायरल करून   नाला सफाई केल्याचा कांगावा करीत दावा केला आणि त्यांनी मोठी  प्रसिद्धी देखील मिळवली    होती  मात्र त्यांचा दावाही फुसका बार  निघाल्याचे पाहवयास मिळाले असून महापालिका आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी नाले सफाई ठेकेदाराने नालेसफाई व्यवस्थित न केल्यास बिल अदा करण्यात येणार असल्याचा इशारा दिला होता त्यामुळे आयुक्त ठेकदारावर काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.  .
भिवंडीत मुसळधार पावसामुळे सखल भाग जलमय ; अनेक दुकानांसह घरांमध्ये शिरले पाणी ; जनजीवन विस्कळीत, नाले सफाईचा पोलखोल.. भिवंडीत मुसळधार पावसामुळे सखल भाग जलमय ; अनेक दुकानांसह घरांमध्ये शिरले पाणी ; जनजीवन विस्कळीत, नाले सफाईचा पोलखोल.. Reviewed by News1 Marathi on June 09, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्म दिन सेवा सप्ताह अंतर्गत महिला स्वसंरक्षण ( Self Defence ) शिबिर संपन्न

ठाणे, प्रतिनिधी  :   पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जन्मदिन सेवा सप्ताहाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिका महिला व बालकल्याण विभाग व डॉ. राजेश मढवी...

Post AD

home ads