Header AD

ब्रह्मांड संगीत कट्टयाचा अध्यक्षांच्या जन्मदिनी आर. डी.व गुलजार यांचा संगीतमय नजराणा !
ठाणे,  प्रतिनिधी  ;  संगीतक्षेत्रात मनोरंजन तसेच शैक्षणिक उपक्रम राबवण्यात अग्रेसर ब्रह्मांड संगीत कट्टा उभारण्यात व प्रगतीपथावर नेण्यात ज्यांचे मोलाचे योगदान आहे ते म्हणजे संगीत कट्टयाचे अध्यक्ष श्री.अरुण दळवी. कलेची आसक्ति बाळगणारा, वय व्याधी याची बंधने झुगारुन आजही  रसिकांना आपल्या कलेद्वारे आनंदी करण्यासाठी धडपडणारा , वडीलकीच्या मायेने संगीत कट्टयाच्या सर्व सदस्यांना प्रेमाच्या बंधनात एकत्र बांधुन ठेवणारा ज्ञानाचा स्त्रोत व चिरतरुण अवलिया म्हणजे श्री. दळवी. दळवी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ६ जून रोजी ऑनलाइन माध्यमाद्वारे 'शाम-ए- गुलज़ार पंचम' हा गुलज़ार व आर्. डी. बर्मन यांच्या अविस्मरणीय गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमाद्वारे संगीत कट्टयाची चतुरस्त्र गायक जोडी श्री. सचिन काकडे व सौ. शीतल बोपलकर यांनी दळवी यांना कट्टयाच्या वतीने मानवंदना दिली.

              कार्यक्रमाच्या सुरूवातीला ब्रम्हांड कट्टयाचे संस्थापक श्री. राजेश जाधव यांनी दळवी यांना शाल व श्रीफळ देऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले. निवेदक श्री. उमेश बोपलकर यांनी दळवी यांच्याशी सुसंवाद साधून त्यांचा जीवनपट उलगडला. यावेळी दळवी यांनी स्वरचित कविता सादर करुन आठवणींना वाट मोकळी करुन दिली. सर्वांचे तोंड गोड करुन गीतांच्या सुमधुर मेजवानीची सुरुवात झाली. 


               सुरेल गळ्याची गायिका शीतल हिने आपल्या तरल आवाजातील 'आजकल पांव जमिंपर', 'तेरे बिना जिया जाए ना', 'छोटीसी कहानी से' या गीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले तसेच ' रोज रोज डाली डाली', 'पिया बावरी' ही शास्त्रीय पाया असलेली गीतेदेखील तितक्याच ताकदीने सादर करुन सशक्त गायकीचे विविध पैलू उलगडले.

               सुरांचे बादशाह सचिन यांनी 'जाने क्या सोचकर', 'ओ मांझी रे', 'फिर वही रात है', 'मुसाफ़िर हूँ यारों', 'आनेवाला पल' या गीतांद्वारे सुरांप्रतिचा ध्यास तसेच भावनिक उत्कटता रसिकांपर्यंत पोहोचवली. त्यांच्या आवाजातील प्रासादिकता वाखाणण्याजोगी होती. सचिन व शीतल यांनी रोमारोमात चैतन्य फुलवणारी 'इस मोड से जाते है', 'तेरे बिना जिंदगी से', 'आपकी आंखों मे', 'तुम आ गए हो', ' रोज़ रोज़ आंखो तले' ही बहारदार द्वंद्वगीते सादर करुन रसिकांच्या मनावर जादू केली.


             उमेश यांनी सूत्रसंचालनाची धुरा यशस्वीरित्या सांभाळली. अप्रतिम संवादकौशल्य व भाषाप्रभुत्व याने नटलेल्या माहितीपूर्ण व दर्जेदार निवेदनाने कार्यक्रमाला चारचांद लावले. अशाप्रकारे आपल्या या लाडक्या प्रेरणास्थानाला प्रेममयी सांगितिक शुभेच्छा देत रसिकांनी श्री. दळवी यांचा जन्मदिन सोहळा उत्साहात पार पाडला.

ब्रह्मांड संगीत कट्टयाचा अध्यक्षांच्या जन्मदिनी आर. डी.व गुलजार यांचा संगीतमय नजराणा ! ब्रह्मांड संगीत कट्टयाचा अध्यक्षांच्या जन्मदिनी आर. डी.व गुलजार यांचा संगीतमय नजराणा ! Reviewed by News1 Marathi on June 07, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads