Header AD

नालेसफाई करणार्‍या ठेकेदारांचे परवाने रद्द करण्याची मागणी

 ठाणे (प्रतिनिधी) - ठाणे पालिका हद्दीमध्ये नालेसफाई कशी कुचकामी झाली आहे. याची प्रचिती पहिल्याच पावसात आली आहे. ठाणे पालिकेने नियुक्त केलेल्या ठेकेदारांनी नालेसफाईच केलेली नसल्याने मुंब्रा-कौसा परिसरातील अनेक ठिकाणे जलमय झाले होते. त्यामुळे कामचुकारपणा करणार्‍या ठेकेदारांचे परवाने रद्द करावेत, अशी मागणी ठाणे परिवहन समिती सदस्य तथा राष्ट्रवादीचे कळवा-मुंबरा विधानसभाध्यक्ष शमीम खान यांनी केली आहे.          शमीम खान यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार,  9 जूनरोजी मुसळधार पावसामुळे मुंब्रा-कौसा परिसरातील सर्व नाले भरले व त्यातील सर्व कचरा सर्वत्र पसरला होता. जर, मुंबा-कौसा परिसरातील ठेकेदारांनी सर्व नाले साफ केले होते तर ही परिस्थीती कशी निर्माण झाली? पहिल्याच पावसात शहर जलमय होत असेल तर पुढील चार महिने साचलेल्या पाण्यातच लोकांनी रहायचे का?        असा सवाल करुन आता रस्त्यावर आलेल्या कचर्‍यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता ही नाकरता येत नाही. जे कोणी ठेकेदार आहेत त्यांना पुन्हा एकदा नाले साफ करण्याचे आदेश देण्यात यावेत; नव्याने नालेसफाई न केल्यास ठेकेदारांना त्यांचे बिल न देता त्यांचे परवाने रद्द करावेत; अन्यथा,   राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आंदोलन  छेडण्यात येईल, असा इशारा खान यांनी दिला आहे.

नालेसफाई करणार्‍या ठेकेदारांचे परवाने रद्द करण्याची मागणी नालेसफाई करणार्‍या ठेकेदारांचे परवाने रद्द करण्याची मागणी Reviewed by News1 Marathi on June 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads