Header AD

महासाथी दरम्यान ट्रक चालक - वाहक समुदायाच्या सुरक्षा आणि आरोग्याच्या दृष्टीने ब्रिजस्टोन इंडियाची मदत
भारत, ; महासाथी दरम्यान कसलाही तुटवडा जाणवणार नाहीभारतातील उद्योग, बाजारपेठा आणि ग्राहकांकरिता पुरवठा साखळ्या खुल्या राहतील याची अतिशय महत्त्वाची जबाबदारी ट्रक चालकांनी स्वत:च्या खांद्यांवर उचलली. या ट्रक चालक समुदायाने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता देशाच्या काना-कोपऱ्यापर्यंत पोहचून आर्थिक चक्र सुरळीत फिरेल याची खातरजमा केली.           हा समुदाय ब्रिजस्टोन परिसंस्था आणि कंपनीचा अविभाज्य भाग मानला जातो. देशाला महासाथीचा पहिला फटका बसलातेव्हापासून ट्रक चालकांनी स्वत:चे काम अव्याहतपणे सुरू ठेवले. अचानक टाळेबंदीची घोषणा होताच अनेक ट्रकचालक-वाहक राज्यांच्या सीमांवर अडकले होते. ब्रिजस्टोन इंडिया ट्रकचालक आणि वाहकांच्या सुरक्षेसाठी कार्यरत आहे.       ब्रिजस्टोन इंडिया’ने ट्रक चालक-वाहक समुदायाचा बचाव करण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक सुरक्षा उपाययोजना आणि स्वच्छतेवर लक्ष केंद्रित केले. त्यांना जवळपास 6000 सेफ्टी किट्स उपलब्ध करून देण्यात आल्या. ज्यामध्ये मास्कहँड ग्लव्हसॅनिटायजर आणि अंघोळीच्या साबणाचा समावेश होता. कोविड संरक्षणाविषयी माहिती या समुदायाला समजावी यासाठी शिक्षण उपक्रम घेतला गेला. कोविड सुरक्षाविषयक व्हिडीओ आणि पोस्टरचा मुबलक वापर करून जागरुकता निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून ब्रिजस्टोन 5000 हून अधिक ट्रक चालक-वाहकांपर्यंत पोहोचली.       जानेवारी 2021पासून ब्रिजस्टोन इंडियाने दृष्टी कॅम्प उपक्रमाच्या माध्यमातून 800 हून अधिक ट्रक चालक-मालकांच्या डोळ्यांची तपासणी केली. जेणेकरून रस्ते अपघात कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. ज्या व्यक्तिंची दृष्टी कमकुवत होतीज्यांना दृष्टिदोष सुधारण्याची आवश्यकता होतीत्यांना चष्म्यांचे वाटप करण्यात आले. कोविड सुरक्षा संबंधी मजकूरव्हिडीओ आणि पोस्टरचे नियमित स्वरुपात वाटप करून ट्रक समुदायात जनजागृती निर्माण करण्यात आली.         ब्रिजस्टोनचा मुख्य उपक्रम प्रोजेक्ट सारथी अंतर्गत कंपनी ट्रक चालक-वाहक समुदायाला कौशल्यसंपन्न करण्याच्या दिशेने कार्यरत राहील. अवजड मोटर वाहकांना चांगल्या रोजगार संधी उपलब्ध होतील आणि सुरक्षित ड्रायव्हिंगची हमी राहील याकरिता त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देणे हे प्रोजेक्ट सारथीचे उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमातंर्गत आजवर 484 अवजड मोटर वाहकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. अधिकाधिक ट्रक चालक-वाहकांपर्यंत पोहोचता यावे म्हणून म्हाळुंगेपुणे आणि खरगपूरपश्चिम बंगाल येथे दोन सारथी केंद्रे उभारण्यात आली.          ट्रक समुदायाला साह्य म्हणून ब्रिजस्टोन इंडियाकडून पहिल्या महासाथीच्या लाटेदरम्यान काही उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. लॉकडाऊन जाहीर होताच काही ट्रक समुदाय महामार्गांवर अडकले होते. त्यांना आपतकालीन परिस्थितीत जीवरक्षक संचस्वच्छता उत्पादने तसेच 15 दिवसांचा शिधा पुरवण्यात आला. दुरुस्ती टप्प्याचा भाग म्हणून टायर दुरुस्ती संच पुरवून 364 टायर फिटरना मदत करण्यात आली. ट्रक समुदायाच्या या भागाला टाळेबंदीचा सर्वाधिक फटका बसला. अनेकांनी उत्पन्नाचे साधन गमावले. 

महासाथी दरम्यान ट्रक चालक - वाहक समुदायाच्या सुरक्षा आणि आरोग्याच्या दृष्टीने ब्रिजस्टोन इंडियाची मदत महासाथी दरम्यान ट्रक चालक - वाहक समुदायाच्या सुरक्षा आणि आरोग्याच्या दृष्टीने ब्रिजस्टोन इंडियाची मदत Reviewed by News1 Marathi on June 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads