Header AD

कल्याण पूर्वेतील अति धोकादायक द्वारका शाळेच्या इमारतीवर निष्‍कासनाची कारवाई
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण पूर्वेतील अतिधोकादायक द्वारका शाळेच्या इमारतीवर निष्‍कासनाची पालिकेच्या पथकाने कारवाई केली आहे.कल्याण डोंबिवली महापलिका परिसरातील  जे प्रभाग क्षेत्रातील कर्पेवाडी येथील द्वारका शाळा ही इमारत ३० वर्षापूर्वीची असून या इमारतीतील शाळा गेल्या १० वर्षापासून बंद आहे. हि इमारत जीर्ण झालेली आहे, या इमारतीत गर्दुले व समाज कंटक बसत असून त्यांचा स्थानिक नागरिकांना त्रास होत असल्याबाबतच्या तक्रारी केडीएमसीकडे प्राप्त झाल्या होत्या. या इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडीट नुसार ही इमारत अतिधोकादायक असल्यामुळे या शाळा इमारतीच्या मालकांस नोटीस बजावून इमारत निष्कासीत करणेबाबत कळवूनही संबंधितांनी ही इमारत निष्‍कासीत केली नाही. यामुळे महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानूसार व विभागीय उपायुक्त विनय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शना खाली जे प्रभागक्षेञ अधिकारी वसंत भोंगाडे यांनी जे प्रभागातील अतिक्रमण निमुर्लन पथकमहापालिका पोलिस व कोळसेवाडी पोलिस स्टेशनचे कर्मचारी तसेच उपअभियंता सुनिल वैदयकनिष्ठ अभियंता धर्मेद्र गोसावी यांच्या मदतीने व 1 जेसीबी1 ब्रेकर,1 गॅस कटरचा वापर करून काल दिवसभर सदर धोकादायक इमारत निष्कासनाची कारवाई केली असून आज हि कारवाई पूर्ण करण्यात आली.

कल्याण पूर्वेतील अति धोकादायक द्वारका शाळेच्या इमारतीवर निष्‍कासनाची कारवाई कल्याण पूर्वेतील अति धोकादायक द्वारका शाळेच्या इमारतीवर निष्‍कासनाची कारवाई Reviewed by News1 Marathi on June 30, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads