Header AD

भिवंडीत पाणी पुरवठा चौकीत घुसला कोब्रा नाग, कामगाराची एकच धावपळ..

 भिवंडी दि 27  (प्रतिनिधी ) : पावसाळ्या दिवसात सापांच्या बिळात पाणी शिरल्याने तसेच हवामानातील  बदलावामुळे  भक्ष्य  शोधण्यासाठी  विषारी  बिन साप  मानवीवस्तीत  शिरल्याच्या  महिन्याभरापासून  घटना घडल्या आहे.  त्यातच आज पुन्हा  एक  विषारी  भलामोठा  कोब्रा  नाग मुबंई महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील पाईपलाईनची देखरेख करणाऱ्या चौकीत  शिरल्याने कामगारांची एकच धावपळ  झाली होती.  भक्ष्य शोधण्यासाठी  कोब्रा नाग पाणी पुरवठा चौकीत  


        ग्रामीण भागात  जंगल, शेती नष्ट करून मोठमोठी गृह संकुले उभारली जात आहे. त्यातच जिल्ह्यात अचानक वातावरण बदल्याने बिळातून विषारी – बिन विषारी साप भक्ष्य शोधण्यासाठी मानवी वस्तीत शिरत असल्याच्या घटना गेल्या काही दिवसापासून वाढल्या आहेत. त्यातच  भिवंडी तालुक्यातील  पोगाव मधून  मुबंई महापालिकेला पाणीपुरवठा करणारी मोठी पाईपलाईन जात असून या पाइपलाईनची देखरेख करण्यासाठी बीएमसीने चौकी  उभारली आहे.        या चौकीतुन बीएमसीचे  कामगार पाईप लाईनची देखभाल करीत असतात. मात्र दुपारच्या  सुमारास अचानक चौकीतील  कामगार फिटर गणेश चौधरी यांना चौकीत घुसताना लांबलचक  कोब्रा नाग दिसला. त्यांनी या विषारी  नागाला  हुसकविण्याचा  प्रयत्न  केला. मात्र कोब्रा नाग चौकीच्या मागे असलेल्या एका पत्र्याखाली  जाऊन  दळून  बसला. त्यांनतर त्यांनी चौकीत  नाग शिरल्याची  माहिती सर्पमित्र  हितेश  करंजावकर  यांना  दिली  असता  सर्पमित्र   हितेश घटनास्थळी  पोहचून  शिताफीने  या  कोब्रा नागाला पकडून  पिशवीत बंद केल्याने  बीएमसीच्या कामगारांनी सुटकेचा  निश्वास  घेतला.  ■निर्सगाच्या सानिध्यात सोडून जीवदान


या  विषारी  कोब्रा नाग साडेपाच फूट लांबीचा असून   वन विभागाच्या अधिकाऱ्याची परवागी घेवून जंगलात निर्सगाच्या सानिध्यात सोडल्याची माहिती सर्पमित्र हितेशने   दिली.  तर दुसरीकडे हवामानात बदल झाल्याने साप भक्ष्य व उब मिळावी म्हणून बिळातून बाहेर येऊन मानवीवस्तीत शिरत असल्याचे सर्पमित्रांचे म्हणणे असून कुठेही मानवीवस्तीत साप दिसल्यास  सर्पमित्रांना  याची  माहिती  तत्काळ  देण्याचे  अहवान  त्यांनी  नागरिकांना  केले  आहे.
भिवंडीत पाणी पुरवठा चौकीत घुसला कोब्रा नाग, कामगाराची एकच धावपळ.. भिवंडीत पाणी पुरवठा चौकीत घुसला  कोब्रा नाग, कामगाराची एकच धावपळ.. Reviewed by News1 Marathi on June 27, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खड्ड्यात पडून शिवसेना शाखा प्रमुख जखमी...

  डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी  हो...

Post AD

home ads