Header AD

दावडी गावात कचऱ्याची समस्यां गंभीर पालिकेच्या शून्य कचरा मोहिमेचा फज्जा

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगर पालिका प्रशासनाने मोठ्या गाजावाजात पालिका क्षेत्रात शून्य कचरा मोहिम राबवून कचरा सेवा कर लागू केला आहे असे असताना मात्र दुसरी कडे महापालिके तील ग्रामीण विभागातील दावडी व आजूबाजूच्या गावातील प्रभागातील  प्रमुख रस्त्यालगत असलेल्या कचरा कुंड्यातील कचरा उचलला जात आहे. तर गल्लीबोळात  जागो जागी कचऱ्याची ढिगच्या ढिग साचले असल्याने ग्रामीण विभागातील नागरिकांच्या आरोग्याला धोक्यात आले असल्याने पालिकेच्या शून्य कचरा मोहिमेचा चांगलाच फज्जा उडाला असल्याचे दिसून येत आहे.             कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील कचऱ्याची वाढती समस्यां लक्षात घेता पालिकेच्या घनकचरा विभागाने ओला सुका कचरा वर्गीकरण करून शून्य कचरा मोहीम राबविली आहे. मनपाने नागरिकांकडून घनकचरा व्यवस्थापन कर आकारण्यास सुरुवात केली आहे. दर दिवसाला २ रुपये याप्रमाणे हा कर आकारला आहे.    पालिकेतील ग्रामीण भागातील दावडी गावात कचरा उठावाची समस्यां भीषण झाली आहे.  घनकचरा विभागाकडून या गावातील कचरा उचलण्यासाठी पालिकेची घंटा गाडी येत असते मात्र गेल्या काही दिवसां पासून पालिकेची घंटा गाडी सकाळच्या सुमारास आठ वाजता येऊन  दोन तासात प्रभागातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या कचरा कुंड्यांतील कचरा उचलण्याचे काम केले जाते. मात्र गावातील गल्ली बोळा व चाळी परिसरात घंटा गाडी पोहचत नसल्याने  नाविलाजस्तव  नागरिक  व रहिवाशी जिथे मिळेल तिथे कचरा टाकत असल्याने गल्ली बोळात कचराच कचरा जमलेला दिसून येत असल्याने कचऱ्याच्या दुर्गंधी मुळे  रोगराई पसरून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या प्रभागातील स्थानिक माजी नगरसेवक जालिंदर  पाटील यांनी पालिकेच्या घनकचरा विभागाचा अनागोदी कारभार  चव्हाट्यावर आणत  नागरिकांना भेडसावणारी समस्यां निदर्शनास आणून दिली आहे. पालिका प्रशासन एकीकडे नागरिकांना  कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी वार्षिक सहाशे रुपये अतिरिक्त कचरा सेवा कर लावला असताना गल्ली बोलातील कचरा उचलला जात नसताना नागरिकांनी कोणत्या कारणाने कचरा कर भरावा असा सवाल उपस्थित केला. गल्लीबोळात कचरा असल्याने दुर्गंधी सुटली असून सद्यस्थितीला कोरोनाच्या महामारी सुरू असताना त्याच्या मुळे अजून रोगराई वाढण्याची भीती वाटत आहे.मनपाने याची प्रत्यक्ष पाहणी करून  लवकरात लवकर कचऱ्याची विल्हेवाट लावावी. नुकतीच पावसाला सुरुवात झाली असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरायला लागली असून रोगराई वाढण्यास सुरुवात झाल्याने पालिकेने याची दक्षता घ्यावी असा इशारा पाटील यांनी दिला आहे. ग्रामीण विभागातील कचरा उठावाच्या कामात होत असलेल्या अनियमितेमुळे पालिकेच्या शून्य कचरा मोहिमेचा चांगलाच फज्जा उडाला असल्याचे दिसून येत आहे.

दावडी गावात कचऱ्याची समस्यां गंभीर पालिकेच्या शून्य कचरा मोहिमेचा फज्जा दावडी गावात कचऱ्याची समस्यां गंभीर पालिकेच्या शून्य कचरा मोहिमेचा फज्जा Reviewed by News1 Marathi on June 08, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads