Header AD

दि.बा.पाटील यांच्या नावासाठी वारकरी सांप्रदायाचा मानवी साखळी आंदोलनाद्वारे पाठिंबा
कल्याण , कुणाल म्हात्रे  : लोकनेते दि.बा.पाटील यांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे यासाठी सर्वच स्तरावर बैठका होत आहेत. ठाणेरायगड जिल्ह्यातील भूमिपुत्रांचीही अशीच मागणी आहे. या मागणीसाठी आता वारकरी सांप्रदायातील मंडळी अग्रेसर झाली असून या मागणीसाठी आता त्यांनी मानवी साखळी आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाचे नियोजन करण्यासाठी मानपाडेश्वर मंदिरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.


या बैठकीत ह.भ.प. मान्यवर वारकरी मंडळी, सर्वपक्षीय हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलारउपाध्यक्ष गुलाब वझेदत्ता वझे, भाजपचे जेष्ठ नेते जगन्नाथ पाटील१४ गाव संघर्ष समितीचे पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.


ठाणे रायगड वारकरी संप्रदायचे अध्यक्ष चेतन म्हात्रे यांनी उपस्थित वारकरी आणि इतर मान्यवरांना वारकरी सांप्रदायाच्या मानवी साखळी आंदोलनाची रूपरेषा सांगितली. तर भूमीपुत्रांचे कनवाळू स्वर्गीय दि. बा. पाटील आपल्या समाजात जन्माला आले ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आमचं अस्तित्व टिकवून ठेवायचं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही हा हट्ट करून लढा देत आहोत. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आम्हा सर्वांना प्रेमआपुलकी आजही आहे आणि पुढेही राहील. देशात अनेक स्मारकेपूलमहामार्ग असतील त्यांना त्यांचे नांव देवू शकता परंतु दि.बा. पाटील हे रत्न याच भूमीत जन्माला आहे आणि तेच आमचं अस्तित्व आहे म्हणून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दि.बा. पाटील यांच नांव देण्यात यावे अशी भूमीका मांडली.


 यावेळी सर्वपक्षीय हक्क संरक्षण समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे यांनी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्याच्या प्रस्तावावर सिडको संचालक मंडळाने शिक्कामोर्तब करुन हा प्रस्ताव शिफारशीसह राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी पाठवला आहे. मात्र नवीमुंबई आतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव द्यावे अशी मागणी रायगडठाणे आणि पालघर जिल्ह्यातील भूमिपुत्र करत आहेत.


येत्या १० जून रोजी कोरोनाचे नियम पाळत आणि मानवी साखळी करत विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी आगरीकोळीकुणबी आणि भूमिपुत्र आंदोलन करणार आहेत. कल्याण-शीळ रोडशीळफाटा ते दहिसर मोरी आणि नेवाळी नाका ते तीसगाव नाका या ठिकाणी मानवी करून शांततेत आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती २७  गाव सर्व पक्षीय संघर्ष समिती उपाध्यक्ष गुलाब वझे यांनी  दिली. मानवी साखळी तयार करण्यासाठी डोंबिवलीकल्याणदिवाशीळ१४ गावमलंगगडकोनगावभिवंडीअंबरनाथ आणि बदलापूर येथून भूमिपुत्र जमा होणार आहेत.

दि.बा.पाटील यांच्या नावासाठी वारकरी सांप्रदायाचा मानवी साखळी आंदोलनाद्वारे पाठिंबा दि.बा.पाटील यांच्या नावासाठी वारकरी सांप्रदायाचा मानवी साखळी आंदोलनाद्वारे पाठिंबा Reviewed by News1 Marathi on June 03, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडीत लाखो रुपयांवर डल्ला मारणाऱ्या ग्रामसेविकेस निलंबित करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ठोकले ग्रामपंचायत कार्यालयास ठोकले टाळे...

भिवंडी दि 25 (प्रतिनिधी ) ग्रामपंचायतीं करीता राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजना अंतर्गत विकास कामांसाठी लाखो रुपये दिले जात अ...

Post AD

home ads