Header AD

🌀🎭झपुर्झा: 😇हसले मनी चांदणे - वर्ष 9 वे💫✨

 ■ठाण्यातील अजेय नाट्य संस्थेच्या  12 वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत वर्षानुवर्षे अविरतपणे सुरू असलेल्या झपुर्झा या महोत्सवाचं यंदाचे हे 9 वे वर्ष. यंदाचा झपुर्झा हा पुन्हा एकदा नव्या स्वरूपात, नव्या रंगात आणि नव्या थीम मध्ये आपल्याला अनुभवता येणार आहे. यंदाची झपुर्झाची थीम आहे हसले मनी चांदणे.  झपुर्झा हसले मनी चांदणे मध्ये अजेय संस्थेचे संस्थापक लेखक, दिग्दर्शक डॉ. क्षितीज कुलकर्णी यांनी लिहिलेली एकूण 12 नाटके ही आपल्याला पाहता येणार आहेत.          डॉ. क्षितीज कुलकर्णी यांच्यासोबत अजेय मधील त्यांचे काही सहकारी कलाकार सुद्धा त्यांच्या बरोबरीने यातील काही नाटकांचे लेखन व दिग्दर्शन करणार आहेत.  याच बरोबर झपुर्झा - हसले मनी चांदणे या झपुर्झा सोहळ्यात आपल्याला अजेय संस्थेच्या शतकोटी रसिक या व्हॉटसऍप समूहातील गुणी गायक मंडळींना अजेयच्या झपुर्झा या कार्यक्रमात गायनाची संधी देऊन त्यांचे गुणात्मक मूल्यमापन करून त्यातील निवडक गुणवंत गायकांचा शतकोटी सूररत्न या पर्वाअंतर्गत सन्मान करण्यात येणार आहे.            तसेच झपुर्झा मध्ये दरवर्षीप्रमाणेच अतिशय उत्सुकतेचा भाग असतो तो म्हणजे झपुर्झा पुरस्कार👑 यावर्षी सुद्धा नाट्य, गायन, नृत्य, लेखन, दिग्दर्शन, प्रमोशन यात आधीपासूनच अजेय मध्ये असलेल्या व यावर्षी पदार्पण केलेल्या तसेच या सर्व विषयांत आपली विशेष चमक दाखवणाऱ्या कलाकारांना यंदाच्या झपुर्झात सुद्धा विविध पुरस्कार व इतर गुणवत्ता प्रमाणपत्रे यांनी  सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच नेहमीप्रमाणेच यंदाच्या झपुर्झा मध्ये सुद्धा अजेयच्या वार्षिक अंक "शब्दझपुर्झा"चे सुद्धा लाईव्ह प्रकाशन होणार आहे.         झपुर्झा या अजेय संस्थेच्या कार्यक्रमामागची विशेष बाब अशी की गेली 9 वर्षे अजेय संस्थेचे सर्वच उपक्रम तसेच झपुर्झा या महोत्सवाची निर्मिती ही संस्थेचा तरुण निर्माता गौरव संभुस याने केली आहे.  अजेय संस्थेने यंदाचा झपुर्झा हा Mix Media Theatre च्या माध्यमातून प्रक्षेपित केला जाणार आहे. झपुर्झा हा कार्यक्रम 27 जून 2021 रोजी प्रक्षेपित होणार आहे.


तिकीट बुक करण्यासाठी आपण खाली दिलेल्या टाऊनस्क्रिप्ट लिंक वर जाऊन आपले तिकीट बुक करू शकता 


*🌀झपूर्झा वर्ष 9वे.🚩*

*😇हसले मनी चांदणे💫✨*

*लेखक,दिग्दर्शक डॉ.क्षितिज कुलकर्णी*

*निर्माता - गौरव संभुस.*

*📹Mix media theater🏤*

*दिनांक - २७ जून २०२१*

*🎭अजेय सामाजिक संस्था🚩*

*झपूर्झा हसले मनी चांदणे वर्ष 9वे* *तिकीट विक्री लिंक.*


*GooglePay , PhonePay , Paytm No: - 9930175527*

*लिंक -* *https://www.townscript.com/e/rppev-120303*

🌀🎭झपुर्झा: 😇हसले मनी चांदणे - वर्ष 9 वे💫✨ 🌀🎭झपुर्झा: 😇हसले मनी चांदणे - वर्ष 9 वे💫✨ Reviewed by News1 Marathi on June 25, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खड्ड्यात पडून शिवसेना शाखा प्रमुख जखमी...

  डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी  हो...

Post AD

home ads