Header AD

नागांच्या 43 पिल्लांना वॉर फाऊंडेशनने केले निसर्ग मुक्त
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण पश्चिमेतील आधारवाडी परिसरात 3 जून रोजी नाले साफसफाईच्या दरम्यान नागीण व तीची 32 अंडी आढळून आली होती महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अग्निशमन दलास फोन करुन माहित दिली व सर्पमित्रांना पाचारण करण्यात आले. वॉर रेस्क्यू टिमला माहित मिळताच प्रेम आहेरपार्थ पाठारे व रेहान मोतिवाला यांनी घटनास्थळी धाव घेत मादी नाग सापाला सुरक्षित बचाव करून  निर्सगमुक्त केले व 32 अंडी वनविभागाकडे स्वाधीन केले. तर दुसर्‍या घटनेत डोंबिवली परिसरात एका घरातून अज्ञात सापसदृष्य जीवाची 11 अंडी आढळून आली होती.  एकूण 43 अंडीचा वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली नैसर्गिक पद्धतीने देखभाल करण्यात आले.  बुधवारी 23 जून रोजी त्या अंड्यातून पहिले नागाचे पिल्लू बाहेर आले. तर  24 जून रोजी इतर पिल्ले असे एकूण 35 पिल्ल सुदृढ स्थितीत बाहेर आली अजून 7 अंडी पिल्ले येणे बाकी आहे व तोपर्यंत इतर पिल्लांना कल्याण वनपरिक्षेत्रातील वनपाल मच्छिंद्र जाधव व वनरक्षक रोहित भोई याच्या समक्ष निर्सगमुक्त करण्यात आले. अशी माहित वॉर फाऊंडेशनचे योगेश कांबळे यांनी दिली.


नागांच्या 43 पिल्लांना वॉर फाऊंडेशनने केले निसर्ग मुक्त नागांच्या 43  पिल्लांना वॉर फाऊंडेशनने केले निसर्ग मुक्त Reviewed by News1 Marathi on June 25, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads