Header AD

राष्ट्रवादी युवक काँग्रेसने 250 विद्यार्थ्यांना दिले शैक्षणिक साहित्य आधारवड संकल्पनेतून वटवृक्षाचे रोपण
ठाणे (प्रतिनिधी) खा. सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसने ठाण्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार, जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहराध्यक्ष विक्रम खामकर आणि विरोधीपक्षनेते अश्रफ शानू पठाण यांच्यानेतृत्वाखाली सुमारे 250 गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे, शहरातील ऑक्सिजन पातळी वाढावी, या उद्देशाने खारीगाव येथे वटवृक्षांचे रोपण करण्यात आले.           राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने खारीगाव दत्तवाडी येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शरद पवार हे ज्या प्रमाणे राष्ट्राचे आधारवड आहेत.           त्याच पद्धतीने वटवृक्ष हा ऑक्सिजन देणारा असल्याने तो प्राणदाता आहे, या संकल्पनेतून खारीगाव भूमीपुत्र मैदान, दत्तवाडी येथे वटवृक्षाचे रोपण करण्यात आले. यावेळी वृक्षप्राधिकरण समिती सदस्या अंकिता जामदार-देशमुख , राष्ट्रवादीच्या महिला कार्याध्यक्षा माजी नगरसेविका सुरेखा पाटील,  राष्ट्रवादी युवक काँग्रेस सरचिटणीस अक्षय जामदार आदी उपस्थित होते.            कोपरी डंपिंग ग्राउंड येथील कचरा वेचकांच्या 100 मुलांना आणि घोडबंदर येथील आदिवासी पाड्यातील 150 मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच पोखरण रोड येथील श्रीमाँ निकेतन येथील अनाथ मुलांना अन्नधान्याचे वाटप  करण्यात आले.


     

         यावेळी  कळवा मुंब्रा विधानसभा कार्याध्यक्ष दिनेश बने, ठाणे युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष समीर नेटके, ठाणे शहर विधानसभा अध्यक्ष अभिषेक पुसाळकर,  विशाल खामकर, संदिप येताळ , दिलीप उपाडे तसेच अनेक नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसने 250 विद्यार्थ्यांना दिले शैक्षणिक साहित्य आधारवड संकल्पनेतून वटवृक्षाचे रोपण राष्ट्रवादी युवक काँग्रेसने 250 विद्यार्थ्यांना दिले शैक्षणिक साहित्य आधारवड संकल्पनेतून वटवृक्षाचे रोपण Reviewed by News1 Marathi on June 30, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads