Header AD

केडीएमसी क्षेत्रात सोमवार पासून निर्बंध होणार शिथिल कोवीड निर्बंधांमध्ये केडीएमसीचा लेव्हल 2 मध्ये समावेश




कल्याण, कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवलीतील नागरिक आणि व्यापारी वर्गासाठी अत्यंत आनंदाची तसेच महत्वाची माहिती आहे. कोवीड रुग्णांच्या कमी होणाऱ्या संख्येमुळे अखेर केडीएमसीचा कोवीड निर्बंधांच्या लेव्हल 3 मधून लेव्हल 2 मध्ये समावेश झाला आहे. त्यामुळे इथले निर्बंध आणखी शिथिल झाले असून येत्या 21 जूनपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी याबाबत नविन आदेश जारी केले आहेत.



गेल्या 2 आठवड्यांपासून केडीएमसी क्षेत्रातील कोवीड रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या कमी झाली आहे. मात्र निर्बंध शिथिल करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या निकषांच्या बॉर्डरवर केडीएमसी येत असल्याने गेले 2 आठवडे लेव्हल 3 मध्ये समावेश झाला होता. मात्र 21 जूनपासून सुरू होणाऱ्या आठवड्यासाठी केडीएमसीने नविन शिथिल झालेले निर्बंध जारी करत लेव्हल 2 मध्ये समावेश झाल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता केडीएमसी क्षेत्रात येत्या 21 जून पासून नविन शिथिल झालेले निर्बंध लागू होणार असून ते  27 जूनपर्यंत लागू असणार आहेत.

केडीएमसी क्षेत्रात सोमवार पासून निर्बंध होणार शिथिल कोवीड निर्बंधांमध्ये केडीएमसीचा लेव्हल 2 मध्ये समावेश केडीएमसी क्षेत्रात सोमवार  पासून निर्बंध होणार शिथिल कोवीड निर्बंधांमध्ये केडीएमसीचा लेव्हल 2 मध्ये समावेश Reviewed by News1 Marathi on June 18, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads