Header AD

चक्रीवादळाचा फटका पक्षी आणि प्राण्यांनाही अनेक पक्ष्यांचा मृत्यू तर काहींना वाचवण्यात यश
कल्याण, कुणाल  म्हात्रे  : तौक्ते चक्रीवादळामूळे केवळ लोकांच्याच मालमत्तेचे नुकसान झाले नसून अनेक मुक्या प्राणी आणि पक्ष्यांनाही त्याचा फटका बसला आहे. कल्याण डोंबिवलीत विविध ठिकाणी झाडं पडून अनेक पक्ष्यांचा मृत्यू झाला. तर या पक्ष्यांच्या इवल्याशा काही पिल्लांना जीवदान देण्यात पक्षीमित्र आणि त्यांच्या संस्थांना यश आले.


चक्री वादळामुळे गेल्या २ दिवसांपासून कल्याण डोंबिवलीत वादळी वाऱ्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. काल तर या वाऱ्यांनी सर्वानाच हादरवून सोडलेले पाहायला मिळाले. या वादळी वाऱ्यांचा तडाखा  दोन दिवस कल्याण डोंबिवलीत वादळी पाऊस पडत आहे. या वादळात अनेक झाडे उन्मळून पडले आहेत व त्याचबरोबर अनेक पक्षांची घरटी मोडून पडली आहेत उनेक पिल्ले उघड्यावर पडली आहेत. तर काही पिल्लांचा पावसात भिजून मृत्यू झाला.


या पिल्लांच्या पुनर्वसनाकरिता कल्याण डोंबिवलीतील पक्षिमित्र व सेवाभावी संस्था पुढे आल्या आहेत. गेले दोन दिवसात वॉर फाऊंडेशनच्या  हेल्पलाईनवर अनेक फोन आले. त्यात अनेक पक्षी मृत झाले होते तर काही पक्षांचा जीव वाचविण्यात पक्षिमित्रांना यश आले आहे. यामध्ये चिमणी 8कावळे 3कबूतर 16खारूताई 2,  राखी बगळा 4भारद्वाज पक्षी 1 आदी पक्ष्यांचा सांभाळ पक्षिमित्र करत आहेत त्याच बरोबर वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली पोपट 2घार 5घुबड 7 आदींवर देखभाल सुरू आहे.

 


कल्याण मधिल पशुवैदयकीय अधिकारी डॉ. सिद्धी रायभोले व टिम त्यांच्यावर प्रथमोपचार करत आहेत. अनेक वन्यजीव तथा पक्षांची मुक्तता करणाऱ्या संस्थाकडून  ताऊक्ते चक्रीवादळात  जखमी अथवा ज्यांना सुरक्षित स्थळी हलविण्याची गरज आहे. आपल्याला कोठेही प्राणी,पक्षी अथवा  यांना मदतीची गरज असल्यास  वॉर रेस्क्यू फाउंडेशनच्या 09869343435 / 07208349301 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  

चक्रीवादळाचा फटका पक्षी आणि प्राण्यांनाही अनेक पक्ष्यांचा मृत्यू तर काहींना वाचवण्यात यश चक्रीवादळाचा फटका पक्षी आणि प्राण्यांनाही अनेक पक्ष्यांचा मृत्यू तर काहींना वाचवण्यात यश Reviewed by News1 Marathi on May 18, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads