Header AD

फिनो पॉईंट्स द्वारे सरकारी साहाय्य पर्याय


कोविडच्या काळात फिनो पेमेंट्स बँकेचा ग्राहकांना दिलासा ......


मुंबई, २ मे २०२१ : कोरोना साथीचा प्रसार आणि अंशतः टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या थेट लाभ हस्तांतरणांगर्तच्या (डीबीटी) निधीचे वाटप लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी फिनो पॉईंट्सने पर्याय उपलब्ध करून दिला आहे. गरजूंना रोख रक्कम प्रदान करत दिलासा देण्यासाठी फिनो पेमेंट्स बँकेचे याबाबतचे जाळे हा महत्वाचा टप्पा मानला जात आहे.   


आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी महाराष्ट्र सरकारने ५,४७६ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य जाहीर केले आहे. यात राज्य सरकारच्या विविध योजनांतर्गत बांधकाम कामगारांना प्रत्येकी १,००० रुपये तर खावटी योजनाअंतर्गत प्रत्येक आदिवासी कुटुंबाला २००० रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तसेच सुमारे ५ लाख फेरीवाले आणि १२ लाख रिक्षा चालकांना प्रत्येकी १५०० रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. ही रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. यानुसार, कोणत्याही बँकेचे खाते असलेले 'डीबीटी' लाभार्थी जवळच्या फिनो पेमेंट्स बँक पॉईंटमधून पैसे काढू शकतात.


फिनो पेमेंट्स बँकेचे वरिष्ठ विभागीय प्रमुख हिमांशू मिश्रा म्हणाले, “ घराजवळ बँकिंग सेवा ही काळाची गरज आहे.” प्रवासबंदी आणि बँकैच्या मर्यादित वेळा यामुळे लोकांना बॅंकिंग सेवा मिळण्यात अडचणी येत आहेत. लोकांची गैरसोय विचारात घेऊन मायक्रो एटीएम आणि एईपीएस उपकरण असलेल्या घराशेजारच्या बॅंकिंग आउटलेट किंवा दुकांनामधून आरामदायी बॅंकिंग सेवा फिनो हमेशाद्वारे उपलब्ध करून दिली जात आहे. ग्राहक कोणत्याही वेळी या पॉईंटमध्ये जाऊ शकतात आणि रोख रक्कम काढू शकतात किंवा त्यांच्या कुटुंबियांना पैसे पाठवू शकतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही रोख रक्कम आमच्या बॅंकिंग पॉईंटवर सदैव उपलब्ध असते. ”

फिनो पॉईंट्स द्वारे सरकारी साहाय्य पर्याय फिनो पॉईंट्स द्वारे सरकारी साहाय्य पर्याय Reviewed by News1 Marathi on May 02, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads