Header AD

ब्रह्मांड संगीत कट्टयावर कोरोना योद्धयाची संगीतमय जनसेवा!
ठाणे , प्रतिनिधी  :  कोरोनाकाळात सर्वत्र भयाचे गर्द मेघ व नैराश्याचा मळभ दाटला असताना थोर कोरोनायोद्धयांच्या संघर्षामुळे व अविरत सेवेमुळे आशेची सोनेरी किरणे  उमेद देत आहेत. डॉ. शाम पालीवाल हे ब्रह्मांड संगीत कट्टयाचे कोरोनायोद्धा. स्वत:च्या जीवावर उदार होऊन लोकांच्या आरोग्यासाठी प्रामाणिकपणे कार्यरत असलेले डॉ. पालीवाल यांनी ऑनलाईन माध्यमातून 'आदमी हूँ आदमी से प्यार करता हूँ' हा सुरेल गीतांचा नजराणा प्रेक्षकांच्या भेटीस आणला. या कार्यक्रमाद्वारे पालीवाल यांनी सांगितिक मनोरंजनाचे डोस देत रसिकांना सकारात्मक उर्जा दिली.ब्रह्मांड संगीत कट्टयाचे संस्थापक राजेश जाधव यांनी डॉ. शाम पालीवाल यांच्या समाजकार्याला सलाम करत त्यांचे आभार मानले. वीणा पालीवाल यांनी गायलेल्या 'केशवा माधवा' या स्तवनाने  कार्यक्रमात सुरुवात झाली. 'बेचारा दिल क्या करे' हे गीत वीणा यांनी दिलखेचक अंदाजात गायले. सुधीर वाळंज यांनी 'मनाच्या धुंदीत' व 'चांद मेरा दिल' अशी सुरेल साद घालत रसिकांच्या मनाचा ताबा घेतला. त्यानंतर एकामागुन एक 'आ दिल क्या', 'तुम क्या जानो', 'मिल गया' अशा जोशपूर्ण गीतांचा खजाना उलगडला. डॉ. पालीवाल यांनी 'आदमी हूँ आदमी से' हे गीत गाऊन या पंक्तिंची सार्थकता पटवून दिली तर 'ओ मेरे दिल के चैन' या त्यांच्या गीताने वातावरण प्रेममय करुन टाकले.

 तरुण गायक गौरव ठाकूर यांनी गायलेल्या 'दिल दिया गल्ला' व 'मेरे रश्के कमर' या सुमधुर गीतांनी त्यांच्या गायकीतील चतुरस्त्रपणाचे दर्शन घडविले. शायद मेरी शादी का खयाल', 'झूठ बोले कौआ काटे' या द्वंद्व गीतातून शाम व वीणा यांनी नवराबायकोच्या नात्यातील तू तू मै मै चपखलपणे दाखविली. शाम व सुधीर यांचे 'रोते हुए आते है सब', सुधीर व गौरव यांचे 'जिंदगी एक सफर', वीणा व गौरव यांचे 'मुझे निंद ना आए', वीणा व सुधीर यांचे 'कोयल बोली' या द्वंद्व गीतांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. आसावरी पालवणकर यांच्या सहजसुंदर व माहितीपर निवेदनाने कार्यक्रमास चारचांद लावले. 


कोरोनायोद्धा शाम यांचा ताणतणाव दूर करणारा हा कार्यक्रम रसिकांसाठी इम्युनिटी बुस्टर ठरला यात वादच नाही.

ब्रह्मांड संगीत कट्टयावर कोरोना योद्धयाची संगीतमय जनसेवा! ब्रह्मांड संगीत कट्टयावर कोरोना योद्धयाची संगीतमय जनसेवा! Reviewed by News1 Marathi on May 24, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads