Header AD

भिवंडीत पुन्हा अनधिकृत ठरविलेल्या इमारतींवर एमएमआरडीएचा हातोडा सुरूच ,बेघर होण्याची मालिका सुरूच ..
भिवंडी दि 4 (प्रतिनिधी ) तालुक्यातील  काल्हेर ग्रामपंचायत क्षेत्रात  पद्मावती डेव्हलपर्स यांनी विकसित केलेल्या दहा इमारती संदर्भातील वाद उच्च न्यायालयात गेला असता न्यायालयाने या सर्व इमारती अनधिकृत ठरवीत कारवाई करण्याचे आदेश दिले असताना सोमवारी एक इमारत उध्वस्त करून अनेक कुटुंबाच्या घरच्या स्वप्नाची राखरांगोळी करण्यात आली असताना मंगळवारी सुद्धा पुन्हा एका  इमारतीवर बुलडोजर फिरवण्यात आल्याने रहिवाशी उघड्यावर आले आहेत, महत्वाची बाब म्हणजे काही नागरिकांनी आपली आयुष्याची पुंजी लावून घर खरेदी केले आहे तर काहींनी कर्ज काढून घर खरेदी केले आहे.


         आशा स्थितीत नवीन घेतलेले घर त्यांच्या समोरच त्यांचे घर उध्वस्त होताना पाहावयास मिळत असल्याचे हृदय द्रावक चित्र पाहावयास मिळत आहे सर्व शासकीय टॅक्स भरून विविध परवानग्या घेऊन ऐन कोरोनाच्या काळात 250 कुटुंब बेघर  होणार  आहेत त्यामुळे एवढ्या मोठ्या इमारती उभ्या होताना एमएमआरडीए, ग्रामपंचायत, महसूल विभाग, विकासक, जागा मालक काय झोपा काढत होता का  असा संतप्त सवाल नागरिक करीत असून या सर्व संबंधीतांवर कडक कारवाई करण्याची मगणी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते किशोर जाधव यांनी करून न्यायालयात जाणार असल्याचे प्रतिनिधिशी बोलताना सांगितले आहे..

भिवंडीत पुन्हा अनधिकृत ठरविलेल्या इमारतींवर एमएमआरडीएचा हातोडा सुरूच ,बेघर होण्याची मालिका सुरूच .. भिवंडीत पुन्हा अनधिकृत ठरविलेल्या  इमारतींवर एमएमआरडीएचा हातोडा सुरूच  ,बेघर होण्याची मालिका सुरूच  .. Reviewed by News1 Marathi on May 04, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads